साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
येथील श्रीकृष्णपुरा, वडचौक, सावतावाडी, शारदा कॉलनी, श्रीराम कॉलनी, शिवाजीनगर यांच्यासह परिसरातील अबालवृद्ध महिला मंडळींसाठी सालाबादप्रमाणे खास मकर संक्रांतनिमित्त माजी नगरसेवक विक्रांत पाटील आणि समाजसेविका स्वप्ना पाटील यांनी ‘माझा प्रभाग पतंग महोत्सव’ आयोजित केला होता. त्यात सर्वांना मोफत पतंग देवून सर्वांनी जोशपूर्ण उत्साहात पतंग उडवून डी. जे. च्या तालावर डान्स नाचत आनंद घेतला. पतंग महोत्सवाचे फुगे व पतंग हवेत सोडून माजी आमदार श्रीमती स्मिता वाघ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी खान्देश शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्ष माधुरी पाटील, बाजार समितीच्या माजी प्रशासक तिलोत्तमा पाटील, उद्योगपती लीना पाटील, रंजना महाजन, कविता मराठे, शितल सोनार, वैशाली कुलकर्णी, नलिनी बारी, प्रतिभा बारी, राजसबाई भोई, वर्षा पाटील, जयमाला धनगर, प्रतिभा पगारे, नलिनी पाटील, विद्या पाटील, रणजित पाटील, माजी सरपंच सुरेश पाटील, कैलास पाटील, प्रमोद सोनार, अरुण पाटील, शरद पाटील, श्याम साळी, बाळू पाटील, मुकेश ठाकूर, प्रवीण ठाकूर, गणेश सोनवणे, शिवम पवार, गणेश बारी, भूषण महाजन, पंकज वाघ, भैय्या पाटील, बंटी पाटील, भटू सैंदाणे, जगदीश सोनार, अशोक पाटील, सागर शेटे, दिनेश शेटे, कमलेश बोरसे, राजेश परदेशी, राकेश शेटे, नितेश चव्हाण, हितेश बारी, जयेश बडगुजर, समाधान पाटील, समाधान नाथबुवा, निरज पाटकरी आदी उपस्थित होते. सूत्रसंचलन प्रकाश महाजन तर आभार स्वप्ना पाटील यांनी मानले.