पाचोऱ्यातील आयोजित मेळाव्यात दिलीप वाघ यांना आमदार करण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार
साईमत/पाचोरा/प्रतिनिधी :
आमदारकीचे ‘स्वप्न’ पाहणाऱ्यांना माझीच मोठी भीती आहे. त्यामुळे माझ्यासंदर्भात चुकीच्या अफवा पसरवून दिशाभूल केली जात असल्याचे पाचोरा मतदार संघाचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी सांगितले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित समर्थक व हितचिंतकांच्या मेळाव्यात येत्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी करून दिलीप वाघ यांना विजयी करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्यावतीने ५८ दिवे पेटवून दिलीप वाघ यांचे औक्षण करण्यात आले. विविध स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पदाधिकाऱ्यांतर्फे त्यांना सन्मानित केले.
गेल्या साठ वर्षांपासून वाघ घराणे समाजसेवेत सक्रिय आहे. सत्ता असो वा नसो लोकसेवा आमचे व्रत आहे. प्रवेश सोहळे करून एकमेकांना धक्के देणाऱ्यांना आता जनताच धक्का देऊन घरी बसविणार आहे. मी कार्यकर्त्यांच्या
बळावर निवडून येणार असल्याचे स्पष्ट करून येत्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारीचे संकेतही माजी आ. दिलीप वाघ यांनी दिले.
यांची होती उपस्थिती
यावेळी संजय वाघ, दगाजी वाघ, मानसिंग पाटील, शांताराम सोनजी पाटील, शालिकराम मालकर, हर्षल पाटील, ललित वाघ, सिताराम पाटील, रमेश चौधरी, खलील देशमुख, विनय जकातदार, व्ही.टी.जोशी, नितीन तावडे, शशिकांत चंदिले, दत्तात्रय पवार, शिवदास पाटील, सुदाम वाघ, संजय एरंडे, मनोज वाघ, मयूर वाघ, विजय पाटील, शाम भोसले, रणजीत पाटील, पी.डी.भोसले, भूषण वाघ, ॲड.अविनाश सुतार, हरुण देशमुख, संजय सूर्यवंशी, राहुल पाटील, कुणाल पाटील, अजहर खान, बापू सोनार, सुचिता वाघ, ज्योती वाघ, ॲड. अभिलाषा रोकडे, सरला पाटील, प्रमिला वाघ यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक विकास पाटील, सूत्रसंचलन माणिक पाटील तर रणजित पाटील यांनी आभार मानले.