Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»अपघाताचा बनाव रचून आई-वडिलांसह भावाचा खून
    क्राईम

    अपघाताचा बनाव रचून आई-वडिलांसह भावाचा खून

    saimatBy saimatJanuary 15, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    हिंगोली :

    जिल्ह्यातील डिग्रस वाणी शिवारात झालेल्या अपघातातील तीन जणांच्या मृत्यू प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. हा अपघात नसून घातपात असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. सख्ख्या मुलानेच आई, वडील आणि भावाचा खून केला असल्याने या घटनेला नवीन वाचा फुटली आहे. मृत आई-वडील आणि भाऊ हे सतत बदनामी करत आहेत, हा राग मनात धरून त्याने तिघांचा खून केला असल्याचे पोलिस चौकशीत स्पष्ट झाले. बासंबा पोलिसांनी आरोपी मुलगा महेंद्र जाधव याला अटक केली आहे.

    डिग्रसवाणी शिवारात गुरुवारी (११ जानेवारी) सकाळी आई-वडील आणि मुलगा अशा तिघांचा मृतदेह रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यामध्ये आढळून आला होता. कुंडलिक श्रीपती जाधव (६५), कलावती कुंडलिक जाधव (६०), आकाश कुंडलिक जाधव (२६) अशी मयतांची नावे आहेत.

    कुंडलिक जाधव यांंची प्रकृती बरी नसल्यामुळे त्यांना उपचारासाठी त्यांचा मुलगा आकाश हा सिरसम येथे घेऊन जात होता. यावेळी त्याची आई कलावतीदेखील त्यांच्यासोबत होती. डिग्रसवाणी येथून काही अंतरावर असलेल्या एका वळणावर आकाश याला दुचाकीवर नियंत्रण मिळविता आले नाही. त्यामुळे दुचाकी रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात पडून तिघांचाही मृत्यू झाल्याचे आरोपी मुलगा महेंद्र जाधव याने पोलिसांना सागितले होते.

    मात्र, घटनास्थळावरील परिस्थिती आणि इतर संशयास्पद गोष्टी लक्षात घेऊन पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांनी या अपघाताचा तपास करण्याचे आदेश बासंबा पोलिसांना दिले होते. लागलीच बासंबा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विलास चवळी यांनी आपल्या तपासाचे सूत्र हलवले आणि यामध्ये त्यांना मदत झाली ती जमादार नाना पोले, खिल्लारे, खंडेराव नरोटे यांची. पोलिसांनी घटनास्थळी तसेच मयतांच्या घरी जाऊन तपास सुरू केला. मयतांच्या घरामध्ये स्वच्छता केलेली दिसून आल्याने पोलिसांचा संशय आणखी बळावला. लागलीच पोलिसांनी आरोपी मुलगा महेंद्र याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची अधिक चौकशी केली असता त्याने तिघांचा खून करून डिग्रसवाणी शिवारात फेकून दिले आणि अपघाताचा बनाव केल्याचे कबूल केले. त्यानंतर पोलिसांनी महेंद्र जाधवला अटक केली.

    आरोपी महेंद्र जाधववर कलम भादंवीप्रमाणे ३०२, ३२३, ५०४ , ५०६ , २०१ नुसार गुन्हा दाखल केला आहे. मृत आई-वडील आणि भाऊ हे आरोपीला पैसे देत नाहीत आणि नातेवाईकांमध्ये सतत बदनामी करतात त्याचा राग मनात धरून त्याने हत्येसारखे भयंकर कृत्य केले. आता या घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Jalgaon : जळगाव हादरले आजाराने थकलेल्या ३४ वर्षीय तरुणाने घेतली गळफास घेऊन आत्महत्या

    January 23, 2026

    Bhadgaon : भडगावमध्ये साधूवेशातील भामट्यांचा धक्कादायक फसवणूक प्रकार; दाम्पत्याची सोन्याच्या अंगठ्या लंपास

    January 23, 2026

    yaval : भुसावळ–यावल रस्त्यावर घडलेल्या एका धक्कादायक बसमध्ये सोन्याची पोत चोरी

    January 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.