Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»Murder case in Telangana state : तेलंगणा राज्यातील खून प्रकरण : जळगावातून फरार आरोपीला अटक
    क्राईम

    Murder case in Telangana state : तेलंगणा राज्यातील खून प्रकरण : जळगावातून फरार आरोपीला अटक

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoMay 19, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    आरोपीला दिले तेलंगणा पोलिसांच्या ताब्यात, एलसीबीची कामगिरी

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

    तेलंगणा राज्यातील सायबराबाद पोलीस आयुक्तालयातील चंदानगर पोलीस स्टेशन हद्दीत दाखल खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला जळगाव पोलिसांनी अटक केली आहे. अझहर निजाम खाटीक (रा. जळगाव) असे आरोपीचे नाव आहे. तो गुन्हा घडल्यापासून सुमारे तीन महिन्यांपासून फरार होता. दरम्यान, पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला चंदानगर पोलीस स्टेशन, पोलीस आयुक्तालय सायबराबाद (तेलंगणा) यांच्या ताब्यात दिले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

    सविस्तर असे की, चंदानगर पोलीस स्टेशनचे पथक आरोपीच्या शोधासाठी जळगाव जिल्ह्यात दाखल झाले होते. आलेल्या पथकाने जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची भेट घेतली होती. त्यांना गुन्ह्याची माहिती दिली.त्यानंतर आरोपीला पकडण्यासाठी स्थानिक पोलिसांच्या मदतीची विनंती केली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षकांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना पथकाला सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश दिले. त्यानंतर एलसीबी जळगावचे सहाय्यक पोलीस फौजदार विजयसिंग पाटील आणि पोलीस हवालदार अक्रम शेख यांचे एक विशेष पथक तयार केले. त्यांना आरोपीला शोधून ताब्यात घेण्याच्या सूचना देऊन मार्गदर्शन केले.

    मेहरुण परिसरात लपल्याची मिळाली होती खात्रीलायक माहिती

    पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी अझहर निजाम खाटीक याचा शोध सुरू केला. तो मेहरुण परिसरात लपल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांनी पाठलाग करून अझहरला शिताफीने ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला तेलंगणा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon:जळगावात खान्देश महोत्सव २०२६ ची भव्य सुरुवात; महिला उद्योजकतेला प्रोत्साहन

    February 27, 2026

    Jalgaon : २५ वर्षांनंतरही जमीन मोबदला न दिल्याबद्दल आयुक्तांना नोटीस

    February 27, 2026

    Jalgaon :जळगाव महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीवर कोल्हे यांची निवड

    February 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.