Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»Jalgaon : खड्ड्यांवर आता पालिकेची जबाबदारी : अपघातग्रस्तांना नुकसान भरपाईचा मार्ग खुला
    जळगाव

    Jalgaon : खड्ड्यांवर आता पालिकेची जबाबदारी : अपघातग्रस्तांना नुकसान भरपाईचा मार्ग खुला

    saimatBy saimatJanuary 21, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Jalgaon: Final preparations for the election of the Standing Committee and Women and Child Welfare Committee Chairpersons in Jalgaon Municipal Corporation
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जळगाव महापालिकेचे जाहीर आवाहन

    साईमत/ जळगाव /प्रतिनिधी

    शहरातील रस्त्यांची दुरवस्था आणि त्यावर पडलेले जीवघेणे खड्डे यामुळे होणाऱ्या अपघातांच्या वाढत्या घटनांची गंभीर दखल घेत जळगाव शहर महानगरपालिकेने नागरिकांना मोठा दिलासा देणारा निर्णय जाहीर केला आहे. उच्च न्यायालयाच्या स्पष्ट आदेशानुसार, महापालिकेच्या हद्दीतील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात होऊन नागरिक जखमी झाल्यास अथवा दुर्दैवाने मृत्यू झाल्यास संबंधित पीडितांना रीतसर नुकसान भरपाई मिळणार आहे.

    मा. उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिका क्रमांक ७१/२०२३ वर १३ ऑक्टोबर २०२५ रोजी सुनावणी झाली होती. या सुनावणीदरम्यान न्यायालयाने रस्ते सुस्थितीत ठेवणे ही स्थानिक स्वराज्य संस्थांची मूलभूत जबाबदारी असल्याचे स्पष्ट करत, रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांचे नुकसान झाल्यास त्यांना मोबदला देणे बंधनकारक असल्याचे आदेश दिले होते. त्या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी जळगाव महापालिकेने हे महत्त्वाचे जाहीर निवेदन प्रसिद्ध केले आहे.

    महानगरपालिकेच्या निवेदनानुसार, ज्या नागरिकांना रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात झाला आहे किंवा ज्यांच्या नातेवाईकांचा अशा अपघातात बळी गेला आहे, त्यांनी नुकसान भरपाईसाठी अर्ज सादर करावा. हा अर्ज आवश्यक पुराव्यांसह शहर अभियंता कार्यालय, ९ वा मजला, सरदार वल्लभभाई पटेल महानगरपालिका प्रशासकीय इमारत, महात्मा गांधी रोड, जळगाव या पत्त्यावर पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

    प्राप्त होणाऱ्या अर्जांची छाननी करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विशेष समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती प्रत्येक अर्जासोबत सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांची आणि पुराव्यांची सखोल पडताळणी करणार असून, त्यानंतर पात्र लाभार्थ्यांना योग्य ती नुकसान भरपाई अदा केली जाईल. ही माहिती अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

    या निर्णयामुळे केवळ अपघातग्रस्त नागरिकांना दिलासा मिळणार नाही, तर महापालिकेवर रस्त्यांची दुरुस्ती आणि देखभाल तातडीने व दर्जेदार पद्धतीने करण्याचा दबावही वाढणार आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांना आळा बसावा आणि नागरिकांच्या जीविताची किंमत प्रशासनाने ओळखावी, या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात असून, शहरातील नागरिकांनी त्याचे स्वागत केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Jalgaon : जळगावात गॅस सिलेंडरसाठी लांबच लांब रांगा

    March 9, 2026

    Pachora-Bhadgaon : पाचोरा-भडगाव तालुक्यात २५ कोटींच्या रस्ते व पुलांच्या कामांना मंजुरी

    March 9, 2026

    Jalgaon : महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले तातडीने कारवाईसाठी निवेदन

    March 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.