थकबाकीअभावी मनपाच्या पथकाकडून १२ दुकाने सील

0
18

साईमत, जळगाव : प्रतिनिधी

प्रभाग समिती क्रमांक तीन अंतर्गत येणाऱ्या मार्केट यार्ड भागातील एकूण ६४ दुकानदारांकडे मालमत्ता थकबाकी करापोटी २८ लाख रुपये थकबाकी होती. त्यांना मनपा प्रशासनाकडून त्या कारणास्तव अधिपत्र बजावण्यात आले होते. परंतु मार्केट यार्ड भागातील ६४ दुकानदारांनी थकबाकी कराचा भरणा न केल्याने ८ जानेवारी २०२४ रोजी मनपा प्रशासनाने दुकाने सीलबंद करण्यासाठी दोन पथकांची नियुक्ती एस.एस.पाटील, प्रकाश सोनवणे या प्रभागाधिकारी वर्गाच्या अधिपत्याखाली प्रत्येकी १० कर्मचारी वर्ग त्यांच्याकडे कार्यवाही करण्यासाठी देण्यात आलेला होता. त्यांचे पथकाने सोमवारी दिवसभर १२ दुकानदारांवर दुकाने सीलबंद करण्याची कार्यवाही केली. २४ दुकानदारांनी जप्तीची अप्रिय कार्यवाही टाळण्यासाठी भीतीपोटी तसेच ऑनलाईन आदी मार्गाने मालमत्ता थकबाकी करापोटीचा भरणा ९ रुपये लाख केलेला आहे.

उर्वरित दुकानदारांवर मंगळवारी मनपा प्रशासनातर्फे कार्यवाही केली जाणार आहे. तसेच ज्या नागरिकांनी, मालमत्ता थकबाकी धारकांनी अभय शास्ती माफी योजनेचा मनपा प्रशासनाने लाभ दिल्यावरही करांचा भरणा केलेला नाही. अशा मालमत्ता थकबाकी धारकांवर महापालिका प्रशासन यापुढे मालमत्ता जप्तीचे कार्यवाहीत सातत्य ठेवणार आहे. ज्या नागरिकांनी, मालमत्ता मिळकत धारकांनी थकबाकी कराचा भरणा केलेला नसेल अशा नागरिकांनी थकबाकी कराचा भरणा त्वरित करून मालमत्ता जप्तीची अप्रिय कार्यवाही टाळावी. मनपा प्रशासना सहकार्य करून थकबाकी कराचा भरणा जास्तीत जास्त करावा, असे आवाहन मनपा प्रशासनातर्फे मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.विद्या गायकवाड, उपायुक्त श्रीमती निर्मला गायकवाड, सह आयुक्त गणेश चाटे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here