Municipal Corporation : सेफ्टिक टाकी खाली करण्यासाठी ८०० रुपये भरूनही मनपाचे दुर्लक्ष

0
14

मलनिस्सारणची टाकी फुल्ल, पिंप्राळा हुडको परिसरात पसरली दुर्गंधी

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

शहरातील पिंप्राळा हुडको परिसरातील नागरिकाने घराजवळील मलनिस्सारणाची सेफ्टिक टाकी फुल्ल भरल्याने त्यांनी रितसर मनपाकडे ८०० रुपये भरून पावती घेऊन पाच महिने उलटले आहे. मात्र, मनपाच्या आरोग्य विभागाने ‘झोपेचे सोंग’ घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पिंप्राळा हुडको परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अशातच डेंग्यू, मलेरियासारखे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत मनपा प्रशासनाने त्वरित सेफ्टिक टाकी खाली करून देण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जैनोद्दीन शेख सलीम मिस्त्री यांनी केली आहे.

शहरातील पिंप्राळा हुडको परिसरातील रहिवासी अशपाक इब्राहिम पिंजारी यांच्या घराजवळील मलनिस्सारणची टाकी फुल्ल झाल्याने त्यांनी मनपा प्रशासनाला १० फेब्रुवारी २०२५ रोजी अर्ज करून रितसर ८०० रुपये भरून ९५८५ क्रमांकाची पावती घेतली. याबाबत वारंवार महानगरपालिकेकडे चकरा मारूनही याकडे मनपाच्या प्रशासनाने कानाडोळा केला आहे. ‘आज येतो, उद्या येतो’ असे करत करत ५ महिन्याचा कालावधी आहे. मात्र, मनपाच्या आरोग्य विभागाकडून याकडे दुर्लक्ष होत आहे.

नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता

मलनिस्सारणाची टाकी फुल्ल झाल्याने परिसरात उग्र वास व दुर्गंधी पसरत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. लहान मुले-मुली तसेच वयोवृद्ध आजारी पडत आहे. याबाबत त्वरित टाकी खाली करण्यात यावी, अशी मागणीही हुडकोतील जैनोद्दीन शेख सलीम मिस्त्री यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here