Cleanliness In Pimprala Hudko : पिंप्राळा हुडकोतील अस्वच्छतेकडे मनपाचे होतेय दुर्लक्ष

0
4

परिसरात होतोय दुषित पाणीपुरवठा ; नागरिकांचे आरोग्य आले धोक्यात

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

शहरातील पिंप्राळा हुडकोत परिसरात अस्वच्छता पसरली आहे. तसेच गेल्या दोन दिवसांपासून दुषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. हुडकोत जागोजागी कचऱ्याचे मोठ-मोठे ढीग साचले आहे. याकडे मनपा प्रशासनाने तातडीने लक्ष घालून कचरा उचलावा, नियमित साफसफाईची व्यवस्था करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

शहरातील पिंप्राळा हुडको भागात कचरा उचलला गेला नसल्याने जागोजागी ढीगचे ढीग साचले आहेत. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. मोकाट जनावरे कचरा खाऊ लागले आहेत. कचऱ्यातील प्लास्टिकमुळे जनावरांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. याकडे मनपाने लक्ष देऊन कचरा उचलावा, अशी मागणी होत आहे. परिसरात उघड्यावर सर्रास कचरा टाकला जातो आणि तो वेळेत उचलला जात नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

मनपाच्या दुर्लक्षाबद्दल होतेय जनतेतून ओरड

पावसामुळे हुडकोत पिण्याच्या पाण्याचा वास येत असल्याने दूषित पाणी नागरिकांना प्यावे लागत आहे. त्यामुळे लहान मुले, वयोवृद्ध आजारी पडत असल्याने मनपाच्या दुर्लक्षाबद्दल जनतेतून ओरड होऊ लागली आहे. त्यामुळे मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने दूषित पाण्याची समस्या त्वरित सोडविण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here