साईमत जळगाव प्रतिनिधी
शहर महानगरपालिका जळगाव दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान अंतर्गत शहरस्तर संघ व्यवस्थापन प्रक्षिशण आपल्या महापालिकेत घेण्यात आले. प्रक्षिशणास शहरातील विविध भागातील महिला वस्तीस्तर संघातील महिलासाठी तसेच समुह संसाधन व्यक्ती (CRP) व शहर स्तर संघाच्या सदस्य यांना मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या उद्याटनाप्रसंगी महापालिकेच्या अतिरीक्त आयुक्त पल्लवी भागवत, उपायुक्त निर्मला गायकवाड, सहाय्यक आयुक्त गणेश चाटे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात सरस्वती पुजनाने करण्यात आली तसेच कार्यक्रमाचे प्रस्तावीक शहर अभियान व्यवस्थापक गायत्री पाटील यांनी केले, तसेच योजनेची माहिती मानसी भापकर यांनी केली. कार्यक्रमात ११० महिला उपस्थीत होते.
उपस्थित महिलांना दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान अंतर्गत कार्यरत कर्मचारी समुदाय संघटक आशा चौधरी, नितीन जोशी, कविता जाधव, शितल कंखरे यांनी उपस्थित महिलांना प्रक्षिशण दिले. यावेळी उपस्थित महिलाना मार्गदर्शन करण्यात आले. कार्यकामामध्ये शहर अभियान व्यवस्थापक शालिग्राम लहासे यांनी महिलांना उद्योगांविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सुत्र संचालन मानसी भापकर यांनी केले. सदर कार्यक्रम उपायुक्त व सहा आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील चार दिवस प्रक्षिशण घेण्यात येणार आहे. यशस्वीतेसाठी दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान अंतर्गत कार्यरत कर्मचारी परीश्रम घेत आहेत.