Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»मुंबई ट्रॅफिक कंट्रोलला आलेल्या मेजेसनं खळबळ, पुन्हा एकदा 26/11 सारखा हल्ला?
    क्राईम

    मुंबई ट्रॅफिक कंट्रोलला आलेल्या मेजेसनं खळबळ, पुन्हा एकदा 26/11 सारखा हल्ला?

    SaimatBy SaimatAugust 20, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी

    एक मोठी बातमी समोर येत आहे.  मुंबईमध्ये (Mumbai) पुन्हा एकदा हल्ला (Attack) होणार असल्याची धमकी मिळाली आहे. मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) ट्रॅफिक कंट्रोल रूमला (Traffic control room)  धमकीचा मेसेज (threatening message)आला आहे. ऐन सणासुदीच्या काळातच हा मेसेज आल्यानं मुंबई पोलिसांची चिंता वाढली आहे.  मुंबई कंट्रोल रुमला धमकीचा मेसेज आल्यानंतर पोलिसांनी पुन्हा एकदा मुंबईत बंदोबस्त वाढवला आहे.

    मुंबई पोलिसांच्या ट्रॅफिक कंट्रोल रुममधील व्हॉट्सअॅप नंबरवर धमकीचा मेसेज आला आहे. या मेसेजमध्ये 6 दहशतवादी भारतात पोहोचल्याचा दावा करण्यात आला आहे. तसंच लवकरच मुंबईत 26/11 सारखा हल्ला करण्याची धमकी या मेसेजमध्ये देण्यात आली आहे. या मेसेजनंतर एकच खळबळ उडाली आहे.  मुंबई पोलिसांनी हाय अलर्ट जारी केला आहे.

    पाकिस्तानी नंबरवरून मेसेज 

    कंट्रोल रूमच्या व्हॉट्सअॅपवर पाकिस्तानी नंबरवरून धमकीचा मेसेज आल्याची माहिती मिळतेय. अभिनंदन मुंबईमध्ये हल्ला होणार आहे. मुंबईमध्ये हल्ला करण्याची तयारी करत आहे. मी पाकिस्तानमधून आहे. तुमचे काही भारतीय मुंबईला उडवण्यात माझी साथ देत आहेत. मुंबईला उडवण्याची पूर्ण तयारी झाली आहे, आता काहीच वेळ शिल्लक आहे. कधीही हल्ला करू शकतो. 26/11 चा हल्ला लक्षात असेलच. नसेल तर आता पुन्हा एकदा पाहा. ही फक्त धमकी नाही तर प्रत्यक्षात येतोय, असा मेसेज पाठवण्यात आला आहे.

    ढे मेसेजमध्ये लिहिण्यात आलं आहे की,  जर लोकेशन ट्रेस करण्याचा प्रयत्न केला, तर ते भारताबाहेरचं दाखवलं जाईल आणि धमाका मुंबईत होईल. भारतात सध्या 6 लोक आहेत, जे हे काम पूर्ण करतील.

    या मेसेजमुळे पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.  मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. दरम्यान ऐन सणासुदीच्या काळात पुन्हा एकदा मुंबईवर हल्ल्याचं सावट आहे. त्यामुळे आता पोलीस यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jalgaon : आंतरराज्यीय घरफोडी टोळीचा मुख्य आरोपी जेरबंद

    January 11, 2026

    Jamner : सामरोद येथे तीन ठिकाणी धाडसी घरफोड्या, लाखोंचा ऐवज लंपास

    January 10, 2026

    Jalgaon : जळगाव जिल्हा परिषदेतील बोगस दिव्यांग प्रकरण : दोन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

    January 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.