मुक्ताईनगर पोलिसांनी पकडले दरोडेखोर मात्र ढाब्यावरील जुगार अड्ड्यावरील दरोड्यात आठ ते दहा लाख रु.पसार झाल्याची चर्चा

0
3

मुक्ताईनगर ः प्रतिनिधी

मुक्ताईनगरकडे आठ ते दहा संशयित दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याच्या गुप्त माहितीवरून मुक्ताईनगर पोलिसांनी सिनेस्टाईल जाळे टाकून ईरटीका गाडी अडवून त्यातून आठ जणांना ताब्यात घेऊन अटक केली असून त्यांच्याजवळ एक गावठी कट्टा, सुरा व ६९ हजार रुपये रोख तसेच मोबाईल मिळून आले असून त्यांंच्यावर मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटना गुरूवारी रात्री साडेआठ ते नऊ वाजेच्या दरम्यान मुक्ताईनगर येथील बोदवड चौफुलीवर घडली .

दरम्यान याबाबत अधिक माहिती अशी की , राजकुमार सी.पोलीस अधिक्षक जळगाव, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी जळगाव, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे मुक्ताईनगर यांनी वेळोवेळी नाकाबंदी करणे, सराईत गुन्हेगार तपासणी करणेबाबत आदेश/सुचना दिल्या होत्या.त्या प्रमाणे कार्यरत असतांना पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांना गोपनीय माहीती मिळाली की, २३ ऑगस्ट रोजी रात्री ८.३० वा.चे सुमारास एका पांढऱ्या रंगाची ईरटीगा गाडीने सात- आठ पुरुष हे दरोडा टाकण्याच्या उद्देशाने मुक्ताईनगर शहराकडे येत आहे.त्यावरुन पोलीस निरीक्षक मोहिते यांनी नाकाबंदीस असलेले पो.उपनिरीक्षक राहुल बोरकर, पोहेकॉ. विनोद सोनवणे,संदिप खंडारे, पोना धर्मेंद्र ठाकूर, पोना संदीप वानखेडे,पोकॉ राहुल बेहनवाल, संदिप धनगर, रविंद्र धनगर, मंगल सोळंके,अमोल जाधव यांना बोदवड चौफुल्ली येथे बोदवड कडून येणाऱ्या वाहनाची तपासणी करण्याची सूचना दिली.

त्यानुसार वरील नाकाबंदी टिमने एक पांढ-या रंगाची इस्टीगा गाडी क्र.एमएच -४६ -८५२१ ही थांबवली. त्यातील इसमांना पोलीस ठाणे येथे आणुन त्यांची आणि वाहनाची झडती घेतली असता खालील प्रमाणे इसम व मुद्देमाल मिळून आला. १) मुकेस फकीरा गणेश वय-४२ रा. बखारी जय भिमवाडी शहापुर जि. बुरहानपुर,२) शेख भुरा शेख बशिर वय-३८ रा. शहापुर, छोटा बाजार जि.बुरहानपुर ३) शेख शरीफ शेख सलीम वय- ३५ रा. इच्छापुर बाजार गल्ली मशिद चे पाठीमागे ४) शाहरुख शहा चांद शहा वय- २०, रा. आगननाका उजैेन ५) अज्जु उर्फ अझरुदीन शेख अमिनुद्दीन वय-३६, विरन कॉलनी १३ नंबर गल्ली अमीनपुरा बुरहानपुर ६) अंकुश तुळशिराम चव्हाण वय- २०,रा. खापरखेडा जि.बुरहानपुर ७) खजेंदरसिंग कुलबिरसिंग रिन वय- ४०, रा. लोधीपुरा बुरहानपुर ८) शेख नईम शेख कय्युम वय- ४५, रा. शहापूर वॉर्ड क्र. छोटाबाजार,तहसिल कार्यालय जवळ, बुरहानपूर

मिळालेला मुद्देमाल असा- रु.६९,६५० रोख रक्कम, रु. ४०,००० किमतीचा एक गावठी कट्टा,रु.१५०० कि.चा तिन जिवंंत काडतूस,रु. १५०० सुरा,रु.६.७७,७५० कि.ची इस्टीगा गाडी, रु.४१.५०० कि.चे ६ मोबाईल फोन,रु.५० कि.ची. सुती दोरी,रु.२०० कि.च्या दोन नंबर प्लेट,आठ इसमांना अटक करुन त्यांचे विरुद्ध ३०७/२०२३ भादवि कलम ३९९, ४०२ सह भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५, ४/२५, मपोका कलम ३७ (१) (३) चे उल्लंघन कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.नि. नागेश मोहिते हे करीत आहे.

ही कारवाई पोलीस अधिक्षक जळगांव एम. राजकुमार , अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी जळगाव, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे मुक्ताईनगर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नागेश मोहिते, सपोनि संंदिप दुनगहु, पोलीस उपनिरीक्षक प्रदिप शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक राहुल बोरकर, पोहेकॉ विनोद सोनवणे, संदिप खंडारे, पोना धर्मेंद्र ठाकुर, संदीप वानखेडे, पोकॉ. राहुल बेहनवाल,संदिप धनगर, रविंद्र धनगर, मंगल सोळंके, अमोल जाधव यांनी केली आहे.

पोलीस प्रशासनाकडून दिशाभूल?

दरम्यान याबाबत पोलीस प्रशासनाकडून दिशाभूल करण्यात येत असल्याची परिसरात चर्चा आहे. याबाबत परिसरात अशी चर्चा आहे की, संबंधित टोळके हे जामनेर ते बोदवड येथील पत्त्याच्या क्लबवरून ८ ते १० लाख रु. रक्कम घेऊन पसार झाले होते त्यामुळे क्लब चालकांनी जामनेर पोलीसांशी संपर्क केला असता त्यांनी लागलीच बोदवड पोलिसांना कळविले परंतु सदर ईरटीगा गाडी ही मुक्ताईनगरच्या दिशेने आल्याने त्यांंनी पुन्हा मुक्ताईनगर पोलिसांना या संदर्भात कळविले त्यामुळे मुक्ताईनगर पोलिसांनी सिनेस्टाईल जाळे टाकून मुक्ताईनगर येथील बोदवड चौफुलीवर गाडी अडवून आठ जणांना ताब्यात घेतले. त्या दरम्यान त्यांनी आठ ते दहा लाख रुपये होते की, जास्त रक्कम होती. बोदवडकडून येताना मुक्ताईनगरच्या रस्त्यामध्ये त्यांनी काही रक्कम फेकली की नेमके पैसे गायब झाले अशी चर्चा देखील होत आहे.तेव्हा त्यांच्याजवळून एक गावठी कट्टा काही रक्कम व सुरा मोबाईल तसेच नंबर प्लेट आढळून आल्याची चर्चा आहे.दरम्यान सदर टोळक्याने खरोखरच क्लब वरून रक्कम चोरली होती काय? नेमकी ती रक्कम किती होती? या प्रकारात पोलिसांनी लाखोंची रक्कम लाटल्याच्या चर्चेसही उधाण आले आहे.

ढाब्यात पत्त्यांचा क्लब

घटनास्थळी ढाब्याच्या नावाखाली पत्त्यांचा क्लब चालतो. दोन दिवसांपूर्वी दरोडेखोरांपैकी दोघेजण या ठिकाणी पत्ता खेळण्याच्या बहाण्याने रेकी करून गेले. माहिती संबंधितांपैकी एकाने नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती साईमत प्रतिनिधीला दिली

मुक्ताईनगरजवळ जेरबंद

याबाबत ढाबा मालक बडगुजर यांनी जामनेर पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. जामनेर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांनी तात्काळ बोदवड मुक्ताईनगर पोलिसांशी संपर्क करून माहिती दिली. माहिती मिळताच नाकाबंदी करण्यात येऊन सदरील आरोपींना मुक्ताईनगर हद्दीत पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या नेतृत्वाखालील पथकाने जेरबंद केले.पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here