साईमत लाईव्ह मुक्ताईनगर प्रतिनिधी
तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकरी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या चुकीमुळे विमा रकमेच्या लाभापासून वंचित राहणार असल्यामुळे विमा लाभाची रक्कम बँक प्रशासनाने देण्याची मागणी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ विवेक सोनवणे यांनी केली आहे.
वातावरणातील नैसर्गिक असमतोल बघता शेती पिकाचे होणाऱ्या नुकसानीच्या अनुषंगाने प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत शेतकरी पिक विमा काढत असून शेतकऱ्याच्या पीक कर्ज खात्यातून बँक विम्या पोटी खरीप, जिरायत अनुषंगाने विमा रक्कम डायरेक्ट कपात करून सदर रक्कम विमा कंपनीकडे वर्ग करते त्या अनुषंगाने सदर शेतकरी विम्याच्या लाभास पात्र असून मुक्ताईनगर तालुक्यातील सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मुक्ताईनगर यांच्या चुकीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना वारंवार विमाच्या लाभाच्या रकमेपासून वंचित राहावे लागत असून यासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शासन व प्रशासनाकडे वारंवार तक्रारी, निवेदने, आंदोलने, मोर्चे ,उपोषणे काढून पीडित शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा मोबदला मिळवून देण्यासाठी लढत आहेत परंतु बँक प्रशासनसह जिल्हा प्रशासन कागदी घोडे नाचून पीडित शेतकऱ्यांची थट्टा करीत असल्याचे चित्र एकंदरीत दिसून दिसून येत असल्याचा आरोप स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ विवेक सोनवणे यांनी केला आहे.
याचे ज्वलंत व जिवंत उदाहरण म्हणजे सन २०१९ मधील शेतकरी कविराज पाटील, शोभा पाटील,नितीन पाटील या शेतकऱ्यांचा सन २०१९ चा विमा बँकेच्या चुकीमुळे चार वर्षांपासून प्रलंबित असलेला विम्याचा मोबदला आजतागायत मिळालेला नाही. तोच प्रकार घोडसगाव येथील शेतकरी राजकुमार मोहनलाल पटेल व चिंचोल गावातील टहाकळी शिवारातील काही शेतकरी यांचा सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मुक्ताईनगर प्रशासनाने पीक कर्ज बँक खात्यातून विम्याची रक्कम कपात केलेली असून सदर रक्कम विमा कंपनीकडे वर्ग न केल्यामुळे कंपनीने मंजूर केलेल्या रकमेच्या लाभापासून नुकसानग्रस्त शेतकरी बँकेच्या चुकीमुळे विमा रकमेच्या लाभापासून वंचित राहणार आहेत परंतु शासन निर्णय 31 ऑक्टोबर 2019 नुसार बँकेच्या चुकीमुळे नुकसानग्रस्त शेतकरी विम्याच्या लाभापासून वंचित राहणार असल्यास नुकसानग्रस्त शेतकऱ्याला लाभाचा मोबदला देण्याची सर्वस्वी जबाबदारी बँक प्रशासनाची राहील या शासन निर्णयानुसार तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सेंट्रल बँकेच्या चुकीमुळे लाभापासून वंचित राहावे लागत असल्यामुळे सदर लाभाची रक्कम सेंट्रल बँक प्रशासनाने द्यावी असे स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ विवेक सोनवणे , शेतकरी सुरेश पाटील हेमंत पाटील यांनी कृषी आयुक्त ,जिल्हाधिकारी ,रिजनल मॅनेजर सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.