भगवान सेनेच्या पाठपुराव्याला यश, सेवानिवृत्त चालकासह वाहकांचा सत्कार
साईमत/जामनेर/प्रतिनिधी :
श्री क्षेत्र मुक्ताईनगर ते श्री क्षेत्र भगवानगड मार्गावर नवीन बस सेवा सुरू केली आहे. यासाठी ‘भगवान सेने’च्या सततच्या पाठपुराव्याला यश आले आहे. जामनेर येथे बस आल्यावर माजी नगराध्यक्षा साधना महाजन यांनी गाडीला हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करुन श्रीफळ प्रदान केले. याप्रसंगी माजी नगरसेवक दीपक तायडे यांनी बस सुरु करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सेवानिवृत्त महारू नाईक यांचा तर मुक्ताईनगर डेपोचे चालक दराडे यांचा भाजपाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर तर न.पा.चे गटनेते डॉ. प्रशांत भोंडे यांनी वाहक घुगे यांचा सत्कार केला. ही गाडी मुक्ताईनगरहुन नियमित ७:३० ला निघणार असल्याचे सांगण्यात आले.
याप्रसंगी भगवान सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर पाटील, ज्येष्ठ मार्गदर्शक दत्तात्रय पाटील, मार्गदर्शक रामदास पालवे, शहराध्यक्ष जितेंद्र काळे तसेच श्री.ढाकणे, ॲड. विजय वंजारी, रवींद्र झाल्टे, सुभाष पवार, राहुल पाटील, सचिन थोरात, निलेश नानोटे, उमेश वराडे, प्रदीप पालवे, सोपान पालवे, जितेंद्र पाटील, गणेश पोळ, गजानन कापसे, कैलास पालवे यांच्यासह जामनेर येथील सर्व वंजारी समाज बांधव, एस.टी. चे अधिकारी, कर्मचारी, प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.