शिवसेना उबाठाच्या संघटकपदी जामनेरचे मुकेश साळुंके

0
32
Oplus_131072

उबाठाच्या माजी मुख्यमंत्र्यांनी घेतली कार्याची दखल

साईमत/जामनेर/प्रतिनिधी :

येथील रहिवासी तथा आदिवासी पारधी क्रांती संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष मुकेश साळुंके यांची उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना उबाठाच्या महाराष्ट्र संघटकपदी नुकतीच निवड केली आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून तमाम पारधी समाज बांधवांच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिकदृष्ट्या विकास करण्यासाठी गेल्या वीस वर्षांपासून महाराष्ट्रभर दौरा केला आहे.

गरजू, वंचित शोषित पारधी समाज बांधवांना न्याय हक्क अधिकार मिळवून देण्यासाठी परिश्रमाची पराकाष्ठा करत आहे. त्यांनी आदिवासी पारधी क्रांती संघटनेची स्थापना करून महाराष्ट्रातील पारधी समाज बांधवांना एकजूट करण्याचे कार्य केले आहे. त्यांच्या अशा सर्व कार्याची दखल घेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुकेश साळुंके यांची शिवसेना पक्षाच्या महाराष्ट्र संघटकपदी निवड केली आहे. त्यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्रभरातून अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here