एमटीएस, जीनियस कीड मेंटल मॅथ अकॅडमीच्या बौद्धिक स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या बालकांचा सत्कार

0
18

साईमत : नवापूर : प्रतिनिधी

जोशाबा सरकार युवा मंडळ संचलित साई संजीवनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या अंतर्गत नवापूर शहरात गेल्या पाच वर्षापासून एमटीएस जळगाव या परीक्षेचे आयोजन करण्यात येते. या परीक्षेत संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यातून स्पर्धक सहभागी होतात व परीक्षा केंद्र हे नवापूर असते. त्याचप्रमाणे गेल्या वर्षभरापासून जीनियस की मेंटल मॅथ अकॅडमी येथे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेच्या विकासासाठी मार्गदर्शन केले जात असते. अशा विविध बौद्धिक स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या बालकांचा सत्कार व गुणगौरव करण्यात आले.

एम टी एस परीक्षेतील इयत्ता दुसरी पासून ते सातवी पर्यंत विद्यार्थी सहभागी होत असतात. यांनी गेल्या फेब्रुवारी 2022 मध्ये झालेल्या परीक्षेत नंदूरबार केंद्रस्तरावर उत्तुंग यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण सोहळा तहसील कार्यालय नवापूर येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष नवापूर चे तहसीलदार महेश पवार यांनी विद्यार्थ्यांना भविष्यात लहान मोठ्या स्पर्धेच्या माध्यमातून आपले घवघवीत यश संपादन करावे असे प्रतिपादन केले.
प्रादेशिक वनक्षेत्रपाल अधिकारी स्नेहल अवसरमल, यांनी आपल्या बालपणाच्या आठवणी सांगत प्रत्येकाने नवीन कार्यासाठी झाड लावून त्याचा संरक्षण करण्याची जबाबदारी घ्यावी अशी भावनिक आवाहन केले. पोलीस उपनिरीक्षक सोनवणे साहेब, नायब तहसीलदार सुरेखा जगताप तसेच जिल्हा परीक्षा संयोजक प्रा डॉ नितीनकुमार माळी यांनी नवापूर शहरातील पालकांनी व विद्यार्थ्यांनी दाखवलेला विश्वास सार्थकी झाल्याचे समाधान व्यक्त केले. मानसशास्त्रीय समुपदेशक नीलिमा माळी यांनी देखील विशेष उपस्थिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुष्का भदाणे व कनिष्का पाटील यांनी, प्रास्ताविक लोकेश पाटील तर आभार प्रथम वळवी यांनी मांडले. या कार्यक्रमासाठी विशेष मार्गदर्शन एमटीएस या परीक्षेचे संयोजक योगेश राणे, जीनियस कीड मेंटल मॅथ अकॅडमीचे संचालक येसुबीयस नरोन्हा, महाराष्ट्राची डायरेक्टर नितीन जगताप,नंदुरबार जिल्ह्याचे डायरेक्टर गायत्री महाजन यांचे लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here