साईमत, त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
सनशाईन इंटरनॅशनल मेकअप अकॅडमी तर्फे ‘मिसेस इंटरनॅशनल क्लासिक दुबई 2023’ कार्यक्रम दुबई येथे उत्साहात संपन्न झाला.
आंतरराष्ट्रीय ब्यूटी सेमिनार अंतर्गत इंटरनॅशनल लंडन कॉलेज येथे प्रशिक्षण प्राप्त केलेल्या 18 महिला या ब्यूटी शोमध्ये सहभागी झाल्या होत्या. इंटरनॅशनल या प्रशिक्षणाचे नियोजन नासिकच्या विनि कौर राजपूत यांनी केले.
या सर्व महिला भारतातील विविध राज्यांमधुन सहभागी झाल्या होत्या. यामधे मीना सूर्यवंशी मध्य प्रदेश, तेजल जगदाळे गुजरात, रोहीनी ठोबे पुणे तर अर्चना म्हस्के, जागृती अव्हाड, दिव्या पाटील, वैष्णवी सोनवणे, कल्पना गरुड, वैशाली नाईक, रोहिणी संतोष ठुबे, प्राची तिवडे नासिक आदी महिलांचा समाव्ोश होता. नासिकच्या ज्योति कमलेश शिंदे यांनी ‘मिसेस इंटरनॅशनल क्लासिक दुबई 2023’ हा किताब पटकविला. ज्योती यांना यापुर्वी समाजमित्र, राज्यस्तरीय जीवनगौरव आदी पुररकार मिळालेले आहेत. त्याचबरोबर अश्विनी सचिन दीक्षित यांनी ‘मिसेस वव्ोशस इंडिया इंटरनेशनल दुबई 2023’ हा किताब पटकवला. कार्यक्रमाचे गेस्ट दुबई चे मिस्टर आर्यन हे होते. कार्यक्रमाचे ज्युरी म्हणुन तेजल जगदाळे, रोहिणी थोंबे, मीना सुर्यवशी आदींनी काम बघितले.