आ.किशोर पाटील, माजी आ. दिलीप वाघ यांचे शक्ति प्रदर्शनात नामांकन दाखल

0
37

आमदारांच्या समर्थनार्थ पालकमंत्री गुलाबराव पाटील, गिरीषभाऊ महाजन पाचोऱ्यात, नामांकनसाठी आजी – माजी आमदारांच्या समर्थकांत उत्साह

साईमत/पाचोरा/प्रतिनिधी

पाचोरा -भडगाव मतदासंघांत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी, २४ ऑक्टोबर रोजी मतदारसंघांचे विद्यमान आणि माजी आमदार यांनी शक्ती प्रदर्शन आणि सभा घेवून आमदारकीचे नामांकन निवडणूक निर्णय अधिकारी भूषण अहिरे यांच्याकडे दाखल केले. नामांकन दाखल करण्यासाठी राजकारणातील पारंपरिक राजकिय प्रतिस्पर्धी आजी – माजी आमदारांनी शक्ती प्रदर्शनाचे दर्शन जनतेला दाखविले.

पाचोरा – भडगाव मतदारसंघांत विधानसभेची चुरस आणि प्रचार दिवसेंदिवस आरोप प्रत्यारोप करून राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. आमदार किशोरआप्पा पाटील यांची उमेदवारी महायुती कडून ठरलेली आणि घोषित झाल्याने आमदार किशोर पाटील यांनी मोंढाळा रोड वरील तुळजाई जिनींग येथे नामांकन सभा घेवून आपल्या विकास कामांच्या जोरावर मतदारसंघांत जनता मला पुन्हा तिसऱ्यांदा निवडून देणार आणि माझी हॅटट्रिक होणार, असा विश्वास व्यक्त केला.

आमदारांनी तुळजाई जिनिंगपासून कृष्णापुरी, आठवडे बाजार, गांधी चौक जामनेररोड ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकापर्यंत ढोल ताशांच्या गजरात सुमारे पंधरा ते वीस हजारांच्या जनसमुदायाच्या उपस्थितीत अभूतपूर्व रॅली काढून शक्ती प्रदर्शन केले.

आमदार किशोर पाटील यांच्या नामांकन भरण्यासाठी शिवसेनेचे वरिष्ठ नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, भाजपचे नेते तथा मंत्री गिरिषभाऊ महाजन, खासदार स्मिताताई वाघ, चाळीसगांव आमदार मंगेश चव्हाण यांची विशेष उपस्थिती होती. आमदार किशोर पाटील यांचे नामांकन दाखल करतांना शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस मधुकर काटे, माजी जिला परिषद सदस्य भूरा आप्पा उपस्थीत होते.

तर माजी आमदार दिलीप वाघ यांनी देखील सकाळी साडे अकरा दरम्यान भडगाव रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज चौकात नामांकन पूर्वी झालेल्या सभेत आमदार किशोर पाटील यांच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात आमदारांनी मतदारसंघांची कशी वाट लावली, असे विविध आरोप केले. माजी आमदार दिलीप वाघ यांची उमेदवारी दाखल करतांना शालिग्राम मालकर, हर्षल पाटील, विकास पाटील उपस्थित होते. तसेच अन्यमध्ये प्रताप हरी पाटील उपस्थित होते.

पाच नामांकन दाखल

१८ पाचोरा – भडगाव विधानसभा निवडणुकीसाठी गुरुवारी, २४ रोजी किशोर धनसिंग पाटील( शिवसेना ) दिलीप ओंकार वाघ (अपक्ष) प्रताप हरी पाटील ( महाराष्ट्र स्वराज्य पक्ष आणि अपक्ष) शेख राजु शेख सलीम (अपक्ष) असे एकूण पाच नामांकन दाखल झाले आहे. या दरम्यान आजी – माजी आमदारांच्या नामांकन रॅलीसाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार न घडता नामांकन दाखल झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here