मु. जे. महाविद्यालयात नेट/सेट मार्गदर्शन कार्यशाळा

0
8

साईमत जळगाव प्रतिनिधी

मूळजी जेठा महाविद्यालयातील भौतिकशास्त्र प्रशाळेमार्फत नेट/सेट जनरल पेपर १ वर तीन दिवसीय कार्यशाळेचा आरंभ मंगळवारी झाला. सदर कार्यशाळा ही ऑफलाईन मोड मध्ये निशुल्क होत असून यात सुमारे १८५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

उदघाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून प्रा.डॉ.व्ही.एस.झोपे उपस्थित होते. अध्यक्षस्थान प्रा. डॉ. के.जी.खडसे यांनी भूषविले. त्यांनी स्पर्धा परीक्षा देण्यासाठी तयारी कशा प्रकारे करावी, याची त्रिसूत्री विद्यार्थ्यांना सांगितली. मंचावर भौतिकशास्त्र प्रशाळा संचालक प्रा.डॉ.किशोर महाजन, कार्यशाळेचे संयोजक डॉ. प्रेमजीत जाधव आणि कार्यक्रमाच्या आयोजन सचिव डॉ. प्रतिभा निकम आदी उपस्थित होते.
उदघाटन प्रसंगी भौतिकशास्त्र प्रशाळा संचालक प्रा.डॉ.किशोर महाजन यांनी महाविद्यालय आणि भौतिकशास्त्र विभागाचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला. कार्यशाळेचे संयोजक डॉ प्रेमजीत जाधव यांनी कार्यशाळेची रूपरेषा विशद केली. डॉ. प्रतिभा निकम यांनी आभार मानाले.

पहिल्या सत्रात डॉ. राजीव पवार यांनी उच्च शिक्षण प्रणाली, तर डॉ. कविता पाटील यांनी डेटा इंटरप्रटेशन या विषयांवर मार्गदर्शन केले. द्वितीय सत्रात डॉ. पंडितराव चव्हाण यांनी कॉम्प्रेहेंशन तर प्रा. सोनाली शर्मा यांनी तर्कशास्त्र या विषयावर मार्गदर्शन केले. प्रत्येक सत्रानंतर विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन परीक्षेचे आयोजन करण्यात येत आहे. बक्षीस वितरण समारंभ २३ फेब्रुवारी रोजी होईल. विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कार्यशाळेचे समन्वयक म्हणून प्रा. भावना मानेकर, डॉ.विशाल भारूड आदींनी केले. यशस्वितेसाठी डॉ. कविता पाटील आणि प्रा. सोनाली शर्मा आदी काम पाहत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here