साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी
खासदार,आमदार आणि जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आणि जिल्हा परिषद,पंचायत समिती सदस्यांच्या नाकावर टिचून सुशिक्षित बेरोजगार तरुणांना नोकरी लावण्यासाठी ठोस आश्वासन देण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात नोकरीचे आमिष सुशिक्षित बेरोजगार तरुणांची आर्थिक फसवणूक असे वृत्त काल प्रसिद्ध झाल्याने सुमारे 20 ते 25 तरुणांकडून प्रत्येकी एक ते दीड लाख रुपये घेतले असल्याने संबंधित सुशिक्षित बेरोजगार तरुणांमध्ये मोठी खळबळ उडाली,आणि त्यांनी आरोग्य विभागातील ज्या एका व्यक्तीस पैसे दिले आहे त्यांच्याशी संपर्क साधून चौकशी केली असता त्या संबंधित आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी सांगितले की आपल्या जळगाव जिल्ह्यात आता लवकरच नव्याने बांधकाम करण्यात आलेले ग्रामीण रुग्णालयात आणि प्राथमिक आरोग्य केंद्रा मध्ये शिपाई, परिचारक,आरोग्य सेवक,लॅब असिस्टंट,व्हनचालक इत्यादी मुला मुलींची नोकर भरती होणारच आहे,त्यामुळे तुम्ही चिंता करू नका तुमचे पैसे बुडणार नाहीत असे ठोस आश्वासन पुन्हा देण्यात आले.
जिल्हा परिषद जळगाव तर्फे जिल्ह्यातील आरोग्य विभागात नौकर भरती करताना जिल्हास्तरावरील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नोंकर भरतीसाठी जाहिरात काढली आहे का? नोकर भरतीची जाहिरात काढली नसली तरी नोकर भरतीचे अधिकार कोणाला दिले आहेत आहेत का? नोकर भरती करतानाचे अटी,शर्ती, नियम काय? इत्यादी अनेक प्रश्न उपस्थित केले जात असले तरी आरोग्य विभागात त्या एका आरोग्य कर्मचाऱ्यांने वीस ते पंचवीस तरुणांकडून प्रत्येकी दीड लाख रुपये घेऊन मोठी रक्कम कोणाच्या आशीर्वादाने जमा केली?आणि ही रक्कम कोणाकोणाला वाटप केली आणि आरोग्य विभागात नोकर भरती करताना आमदार,खासदार, जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य यांना विश्वासात घेतले जाणार आहे किंवा नाही? किंवा ज्या कर्मचाऱ्याने अनधिकृत पणे सुशिक्षित बेरोजगार तरुणांकडून लाखो रुपये घेतले त्यांचीच नौकर भरती जिल्हा परिषद आरोग्य विभागाला मान्य राहील का? इत्यादी अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून याची वरिष्ठ स्तरावरून चौकशी करून कडक कारवाई करावी असे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात बोलले जात आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामध्ये नोकरी लावून देण्याच्या कारणावरून यावल तालुक्यात वीस ते पंचवीस तरुणांकडून प्रत्येकी 1 ते दीड लाख रुपये खंडणी घेऊन सुशिक्षित बेरोजगार तरुणांची फसवणूक झाल्याची यावल तालुक्यासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात आरोग्य विभागात आणि पंचायत समिती कार्यक्षेत्रात ग्रामीण भागात खमंग चर्चा सुरू असल्याने चोपडा विधानसभेच्या आमदार सौ.लताताई सोनवणे आणि रावेर विधानसभा आमदार शिरीषदादा चौधरी यांना आपल्या मतदारसंघातील सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या बेरोजगार तरुणांची आर्थिक फसवणूक हे एक मोठे आव्हान असल्याची यावल,रावेर,चोपडा तालुक्यात बोलले जात आहे.
यावल तालुक्याचा पूर्व भाग हा रावेर विधानसभा मतदारसंघाचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या कार्यक्षेत्रात तसेच यावल तालुक्याचा पश्चिम भाग हा चोपडा विधानसभेच्या आमदार सौ.लताताई सोनवणे यांच्या कार्यक्षेत्रात येतो.दोघेही आमदार राजकीय पक्षाच्या दृष्टीने आणि पूर्व पश्चिम दिशेप्रमाणे विरुद्ध टोकावर आहेत दोघेही आमदार सक्षम असल्यावर सुद्धा यांच्या मतदारसंघातील एका शासकीय अधिकाऱ्याने आपल्या मतदार संघातील 20 ते 25 सुशिक्षित बेरोजगार तरुणांना गाठून जिल्हा परिषद जळगाव आरोग्य विभागात नोकरी लावून देण्यासाठी प्रत्येकी एक ते दीड लाख रुपये घेऊन तरुणांना पद्धतशीरपणे चुना लावला बेरोजगार तरुणांना आश्वासनावर आश्वासने दिली जात असून आरोग्य विभागात नोकरी लागत नसल्याने मात्र आता ते सर्व तरुण हवालदील झाले असून आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे उघडपणे बोलत आहे याकडे रावेर चोपडा विधानसभा मतदारसंघाच्या आमदारांनी आपले सर्व राजकीय वर्चस्व पणाला लावून या अधिकाऱ्याने सुशिक्षित बेरोजगार तरुणांची लाखो रुपयात फसवणूक केली त्याची चौकशी करून कार्यवाही करून प्रकरण चव्हाट्यावर जनतेच्या माहितीसाठी आणावे असे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात बोलले जात आहे.तरुणांची फसवणूक करणारा शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी कोण? आणि त्याने आपल्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा आणि प्रभाव तरुणांवर कोणत्या पद्धतीने टाकला याबाबत सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.