साईमत लाईव्ह चाळीसगाव प्रतिनिधी
चाळीसगाव-नागद रोडवरील झोपडपट्टीत राहणारा बाजीदखान साबीरखान (वय 23) यास स्थानबंध्द करण्यात आले आहे
बाजीदखानविरुध्द चाळीसगांव शहर पोलीस स्टेशनला खुनाचा प्रयत्न- 1, गंभीर दुखापत- 3, साथीदारांना सोबत घेऊन दंगल करणे-1 असे 5 गुन्हे दाखल होते. वाजीदखानवर वेळोवेळी प्रतीबंधात्मक कारवाई करण्यात येऊनही त्याच्या स्वभावात बदल न झाल्यामुळे त्यास सन 2021 मध्ये जळगाव व नाशिक जिल्ह्यातुन दोन वर्षाच्या कालावधीसाठी हद्दपार करण्यात आले होते.
21 सप्टेंबर, 2022 रोजी उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये हद्दपारीचा आदेश रद्द झाल्यानंतर 19 नोव्हेंबर, 2022 रोजी वाजीदखानवर चाळीसगांव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुरनं. 493/2022 भादवि कलम 307, 323, 143, 144, 147, 148, 149, 506 प्रमाणे गुन्हा दाखल कारण्यात आला होता. या गुन्ह्यात दिनांक 20 नोव्हेंबर, 2023 रोजी त्याला अटक करण्यात आली होती. वाजीदखानला वेळोवेळी गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आल्यानंतर तो न्यायालयातून जामीनावर सुटताच पुन्हा सराईतपणे गुन्हे करीत होता. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता तो व सोबतच्या गुंडांसह घातक शस्त्रे बाळगून लोकांवर दहशत निर्माण करीत होता त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा निर्माण होऊन लोकांच्या मनात असुरक्षिततेची भावना तयार झाली होती . दिवसंदिवस वेगवेगळया तऱ्हेने गुन्हे करण्याची त्यांची प्रवृत्ती बळावत असल्याने सामान्य लोकांच्या जिवीतास तो उपद्रवी बनला होता.
त्याच्याविरुध्द एम.पी.डी.ए. कायद्यानुसार (महाराष्ट्र झोपडपटटी दादा व धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती व व्हिडीओ पायरेट यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे बाबत अधिनियम सन 1981) नुसार ‘धोकादायक व्यक्ती’ या संज्ञेत तो मोडत असल्याने त्याच्याविरुध्द कारवाई करणे आवश्यक होते.
अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, सहाय्यक पोलीस अधिक्षक अभयसिंग देशमुख यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे वाजीदखान साबीरखानविरुध्द पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड, पोना विनोद भोई, पोकॉ उज्वलकुमार म्हस्के यांनी चौकशी करुन 11 फेब्रुवारीरोजी पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांना प्रस्ताव सादर केला होता या प्रस्तावाची पडताळणी करुन तो पोलीस अधिक्षक यांनी जिल्हादंडाधिकारी यांच्या कार्यालयात पाठविला होता.
त्यानंतर 28 एप्रिलरोजी जिल्हादंडाधिकारी यांच्या कार्यालयाचे आदेशान्वये (क्रमांक दंडप्र./ कावि/ एम.पी.डी.ए./ 47/2023) एम.पी.डी.ए.कायद्यान्वये वाजीदखानविरुध्द स्थानबध्दतेचा आदेश जारी केल्याने पोलीस अधिक्षक, अपर पोलीस अधीक्षक, सहायक पोलीस अधिक्षक यांच्या मागदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील व त्यांचे सहकारी सुहास आव्हाड (पोलीस उपनिरीक्षक), पोहेकॉ योगेश बेलदार, पोना विनोद भोई, पोना भूषण पाटील, राहुल सोनवणे, पोकॉ उज्वलकुमार म्हस्के, पोकॉ विजय पाटील, पोकॉ विनोद खैरनार, पोकॉ आशुतोष सोनवणे, पोकॉ रविंद्र बच्छे यांनी 28 एप्रिलरोजी वाजीदखानला ताब्यात घेऊन मध्यवर्ती कारागृह, येरवडा (पुणे) येथे त्याची रवानगी करण्यात आलेली आहे.
यापुर्वीदेखील सराईत गुन्हेगार निखील अजबे (वय 21, र्े रा. नारायणवाडी, चाळीसगांव) याच्याविरुध्द एम.पी.डी.ए. कायद्यान्वये कारवाई करुन त्याला मध्यवर्ती कारागृह, अमरावती येथे स्थानबध्द करण्यात आलेले आहे. तसेच मोक्का कायद्यान्वये देखील कारवाई करण्यात आलेली आहे.