Bendale Women’s College : बेंडाळे महिला महाविद्यालय, टेन एआयज् कन्सल्टिंगमध्ये इंटर्नशिपसाठी झाला सामंजस्य करार

0
27

११ विद्यार्थिनींना प्रत्येकी १५ हजार रुपये विद्यावेतनाची केली घोषणा

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

शहरातील डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय आणि टेन एआयज् प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात विद्यार्थिनींच्या कौशल्य विकासासाठी एक महत्त्वपूर्ण असा सामंजस्य करार (एमओयु) नुकताच झाला आहे. या करारातंर्गंत टेन एआयज् कंपनीने महाविद्यालयातील ११ निवडक विद्यार्थिनींना कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील प्रगत प्रशिक्षण देण्यासाठी १० आठवड्यांचा विशेष कोर्स मोफत उपलब्ध करून दिला आहे. यासोबतच प्रत्येक विद्यार्थिनीला १५ हजार रुपये विद्यावेतन देण्याची घोषणाही कंपनीने केली आहे. कोर्सच्या उद्घाटनाचा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही.जे. पाटील यांच्या हस्ते शनिवारी, १२ जुलै रोजी ऑनलाइन पद्धतीने पार पडला. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रमोद तायडे, उपप्राचार्य डॉ. सत्यजित साळवे, डी.एस. कट्यारे, कोर्सच्या हेड ऑफ स्टुडिओ स्वरदा ओगले, प्रा.डाॅ.स्मिता चौधरी, समन्वयक डॉ. हर्षाली पाटील, डॉ. मोनाली खाचणे, प्रा. वैशाली विसपुते, प्रा. देपुरा यांच्यासह निवडक विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

उपक्रमात कंपनीच्या संचालिका प्रीती चांदोरकर, हेड ऑफ प्रोडक्ट्स आर्या चांदोरकर, हेड ऑफ स्टुडिओ स्वरदा ओगले, हेड ऑफ इंजिनिअरिंग सिद्धांत गाडे यांनी परिश्रम घेऊन विद्यार्थिनींसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रगत तंत्रज्ञानावर आधारित एक सर्वसमावेशक कोर्स तयार केला आहे. हा कोर्स विद्यार्थिनींना एआय तंत्रज्ञानातील नवीन संकल्पना, त्यांचा व्यावहारिक उपयोग आणि उद्योगातील आव्हाने यांचे सखोल मार्गदर्शन करेल. अशा प्रशिक्षणामुळे विद्यार्थिनींना भविष्यातील तंत्रज्ञान क्षेत्रात यशस्वी करिअर घडविण्यासाठी आवश्यक कौशल्ये प्राप्त होणार आहेत.

कौशल्ये आत्मसात करण्याची संधी

हा करार विद्यार्थिनींच्या भविष्यासाठी एक मैलाचा दगड ठरणार आहे. टेन एआयज्सारख्या नामांकित कंपनीसोबत झालेल्या सहकार्यामुळे विद्यार्थिनींना जागतिक स्तरावरील कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळेल, असे उद्घाटन प्रसंगी प्राचार्य डॉ. व्ही.जे. पाटील यांनी सांगितले.कोर्ससाठी निवड झालेल्या ११ विद्यार्थिनी गरजू त्यासोबत उत्साही आणि सक्षम आहेत. त्यांना टेन एआयज्सारख्या कंपनीकडून मार्गदर्शन मिळणे ही त्यांच्यासाठी मोठी संधी असल्याचे कोर्सच्या समन्वयक डॉ. हर्षाली पाटील यांनी सांगितले. यावेळी उपप्राचार्यांसह कट्यारे यांनी उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थिनींना त्याचा पूर्ण लाभ घेण्याचे आवाहन केले.

तंत्रज्ञान क्षेत्रात विद्यार्थिनींना मिळणार नवी दिशा

अशा सामंजस्य करारामुळे महाविद्यालय आणि टेन एआयज् यांच्यातील सहकार्य आणखी दृढ होणार आहे. भविष्यात आणखी विद्यार्थिनींना अशा संधी उपलब्ध करून देण्याचा मानस दोन्ही संस्थांनी व्यक्त केला आहे. अशा उपक्रमामुळे जळगावच्या विद्यार्थिनींना तंत्रज्ञान क्षेत्रात एक नवी दिशा मिळाली आहे. त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा एक महत्त्वपूर्ण प्रयत्न ठरेल, असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे यांच्यासह संचालक मंडळांनी व्यक्त केला आहे.

इंटर्नशिपसाठी निवडीत ११ विद्यार्थिनींचा समावेश

इंटर्नशिपसाठी द्वितीय, तृतीय संगणक शास्त्र विषयाच्या ११ विद्यार्थिनींची निवड झाली आहे. त्यात भाग्यश्री सुनील पाटील, आकांक्षा सुनील आढाव, दुर्गा निलेश विसपुते, यामिनी रामचंद्र पाटील, चंद्रमा विकास पाटील, गीतांजली दिलीप पाटील, लीना छगन खैरनार, प्रेरणा किशोर काळे, शितल कर्तार जाधव, लक्ष्मी सुनील चौधरी, वैष्णवी गणेश वाणी यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here