एका मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची चाळीसगाव-सम्भाजीनगर मार्गावरील
साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी :
चाळीसगाव-सम्भाजीनगर मार्गावरील कन्नड घाटात अज्ञात वाहनाने मोटारसायकलला दिलेल्या घडकेत शहागंज, संभाजीनगर येथील एका मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दि.२३ रोजी सकाळी ७ ते ८ वाजेच्या दरम्यान घडली.सिकंदर खान शेर खान (वय 56, शहागंज, संभाजीनगर) असे मयत इसमाचे नाव आहे.
घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, सिकंदर खान शेर खान आपल्या मोटारसायकलीवरून (एम.एच.20 – जीएस 9273)ने संभाजीनगरकडे जात होते. दस्तुरी फाटा या ठिकाणी अज्ञात वाहनाने त्यांना मागून जोरदार धडक दिली. या धडकेनंतर सिकंदर खान मोटारसायकलीसह रस्त्याच्या कडेला फेकले गेले व गंभीर जखमी झाले.
घटनास्थळी माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे अंमलदार सुनील पाटील घटनास्थळी तातडीने पोहोचले. त्यांनी 108 क्रमांकावर संपर्क साधून ॲम्बुलन्सची मदत घेऊन जखमी अवस्थेत असलेल्या सिकंदर खान यांना चाळीसगाव शहरातील महात्मा ज्योतिबा फुले ट्रॉमा केअर सेंटर, ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.या अपघातानंतर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये अपघाताचा गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार विकास चव्हाण करीत आहेत.