Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»अमळनेर»Motorcycle ; मोटारसायकल चोरी करणारी टोळी जेरबंद
    अमळनेर

    Motorcycle ; मोटारसायकल चोरी करणारी टोळी जेरबंद

    saimatBy saimatNovember 12, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर पोलिसांची धडक कारवाई; २४ दुचाकींसह १५ लाखांचा मुद्देमाल जप्त

    साईमत/अमळनेर /प्रतिनिधी :  

    अमळनेर शहरासह परिसरात वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांचा छडा लावत पोलिसांनी दोन आरोपींना जेरबंद केले असून, त्यांच्या ताब्यातून तब्बल २४ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त वाहनांची एकूण किंमत सुमारे १५ लाख ६३ हजार रुपये असून, या यशस्वी कारवाईने अमळनेर पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे.

    ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलिस अधीक्षक कविता नेरकर (चाळीसगाव विभाग) आणि उपविभागीय पोलिस अधिकारी विनायकराव कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. अमळनेर पोलिस स्टेशन गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज, पोकॉ प्रशांत पाटील, गणेश पाटील, उज्वलकुमार म्हसके, नितीन मनोरे, उज्वल पाटील आणि हितेश बेहरे यांनी ही कारवाई केली.अमळनेर पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या गुन्हा क्रमांक ३०८/२०२५, २९९/२०२५ आणि २३३/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अंतर्गत दाखल मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू असताना पोलिसांना परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि डंप डेटा यांच्या आधारे संशयितांची माहिती मिळाली.

    त्यानुसार अमळनेर परिसरातील तसेच इतर ठिकाणांवरील चोरीत सहभागी असलेले आरोपी हिमंत रहज्या पावरा आणि अंबालाल भुरट्या खरर्ड (दोन्ही रा. सातपिंप्री, ता. शहादा, जि. नंदुरबार) हे असल्याचे स्पष्ट झाले.
    पोलिसांनी मोठ्या शिताफीने धडगाव (जि. नंदुरबार) येथील डोंगराळ व जंगल परिसरात सापळा रचून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी अमळनेर तसेच इतर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सातपिंप्री परिसरातील जंगलात जाऊन लपवलेल्या सर्व मोटारसायकली हस्तगत केल्या.

    जप्त वाहनांमध्ये होंडा, बजाज, टीव्हीएस या नामांकित कंपन्यांच्या २४ मोटारसायकली असून त्यांची एकूण किंमत १५ लाख ६३ हजार रुपये इतकी आहे. जप्तीचा पंचनामा करून सर्व मोटारसायकली अमळनेर पोलीस ठाण्यात आणण्यात आल्या आहेत. आरोपींना अमळनेर पोलीस ठाण्याच्या गुन्हा क्रमांक ३०८/२०२५ अंतर्गत अटक करण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ काशिनाथ पाटील आणि पोकॉ सागर साळुंखे हे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Malegaon:मालेगाव मार्गावर भीषण अपघात सातोड कुटुंबाचा अपघातात जागीच मृत्यू

    March 6, 2026

    Yaval: हंबर्डी गावात विवाहित तरुणाची आत्महत्या; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

    March 6, 2026

    Jalgaon, Erandol Taluka:भातखेडा हादरला तरुणाचा धक्कादायक आत्महत्येचा प्रकार उघडकीस

    March 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.