साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
राष्ट्रनायक महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पहिल्या लढाऊ संघटनेचा म्हणजेच समता सैनिक दलाचा ९७ वा वर्धापन दिन चाळीसगाव येथे भव्य बाईक रॅली काढून बुधवारी साजरा करण्यात आला. राज्याध्यक्ष धर्मभूषण बागुल यांच्या नेतृत्वात निघालेल्या बाईक रॅलीचे आयोजन चाळीसगाव तालुका शाखेने केले होते. रॅलीत शेकडोंच्या संख्येने मोटार सायकल घेऊन युवा तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते सहभागी झाले होते. दै.ग्रामस्थचे संपादक, फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक किसनराव जोर्वेकर या ज्येष्ठ नेत्यांच्या हस्ते झेंडा फडकवून रॅलीस रेल्वेस्टेशन येथून प्रारंभ करण्यात आला.
रॅलीत ज्येष्ठ नगरसेवक रामचंद्र जाधव, ज्येष्ठ कार्यकर्ते गौतम जाधव, देविदास जाधव, वसंत मरसाळे, सोमनाथ गायकवाड, रमेश भारती, अनिल पगारे, किरण खैरे, बाबुलाल शिरसाठ यांच्यासह अनेक ज्येष्ठांनी सहभाग दिला. शहरातील प्रमुख रस्त्यांवरून रॅली निघाली. त्यानंतर समता सैनिक दलाचे केंद्रीय कार्यालय येथे विसर्जित झाली.
यशस्वीतेसाठी जिल्हा सचिव नितीन मरसाळे, जिल्हा संपर्क प्रमुख भाईदास गोलाईत यांच्यासह तालुकाध्यक्ष महेंद्र जाधव, सचिव सचिन गांगुर्डे, ज्येष्ठ कार्यकर्ते स्वप्नील जाधव, उपाध्यक्ष जीवन जाधव, सोनाली लोखंडे, तालुका संपर्कप्रमुख मनोज जाधव, माया अहिरे, अभिजित निकम, वाल्मीक अल्हाट, यशवंत दाभाडे, महेंद्र निकम, शिवाजी शिंदे, रवींद्र जाधव, सदाशिव कदम, मुकेश जाधव, ॲड.तुषार पाटील, बाबा पगारे, विशाल पगारे, सीताराम जाधव, राहुल गुजर, अमजद खान, गफ्फार शाह, भैय्या बागुल, नितीन जवराळे, मयूर बागुल, गणेश अहिरे, अजय खालकर, रतन अहिरे, विश्वजित जाधव, राहुल राखुंडे, आकाश कसबे, करण राखपसरे, कुणाल अहिरे, धनंजय अहिरे, अवधेश बागुल, घनशाम बागुल यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.