Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राज्य»‘समृद्धी’वर सर्वाधिक अपघाती मृत्यू मध्यरात्रीनंतर
    राज्य

    ‘समृद्धी’वर सर्वाधिक अपघाती मृत्यू मध्यरात्रीनंतर

    saimatBy saimatAugust 30, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नागपूर :

    समृद्धी महामार्गावर सर्वाधिक अपघात सकाळी ६ ते दुपारी १२ पर्यंत तर सर्वाधिक अपघाती मृत्यू हे रात्री १२ ते ३ च्या दरम्यान नोंदवण्यात आले आहे. ११ डिसेंबर २०२२ ते ३१ डिसेंबर २०२३ पर्यंतच्या कालावधीमधील अपघातांबाबत महामार्ग (सुरक्षा) पोलिसांच्या अहवालातून ही माहिती पुढे आली आहे.

    पंतप्रधानांनी ११ डिसेंबर २०२२ रोजी समृद्धी महामार्गाचे लोकार्पण केले. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा महामार्ग सर्वात सुरक्षित असल्याचा दावा केला होता. परंतु, उद्घाटनापासून ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत समृद्धी महामार्गावर एकूण ७२९ अपघात झाले. त्यात १०१ नागरिकांचा मृत्यू झाला. तर २६२ जण गंभीर तर ४८६ जण किरकोळ जखमी झाले. अपघातांचे विश्लेषण केले असता सकाळी ६ ते दुपारी १२ पर्यंत सर्वाधिक २११ अपघात झाले. त्यापैकी १०५ अपघातांत कुणीही जखमी नाही. तर १०६ अपघातांत २१ जणांचा मृत्यू तर ६० गंभीर तर १२५ जण किरकोळ जखमी झाले. सर्वाधिक अपघाती मृत्यू रात्री १२ ते रात्री ३ पर्यंतच्या काळात झाले. या काळात ९१ अपघातांपैकी ३२ मध्ये कुणीही जखमी नाही. शिल्लक ५९ अपघातांत ४४ मृत्यू तर ३९ जण गंभीर तर ८४ जण किरकोळ जखमी झाले. रात्री ३ ते पहाटे ६ पर्यंत येथे १४६ अपघातांपैकी ६४ मध्ये कुणीही जखमी नाही. तर शिल्लक ८२ अपघातांत ९ मृत्यू, ७९ गंभीर तर ९६ जण किरकोळ जखमी झाले. दुपारी १२ ते संध्याकाळी ६ पर्यंत येथे १६८ अपघातांपैकी ७२ मध्ये कुणीही जखमी नाही. तर शिल्लक ९६ अपघातांत १७ मृत्यू तर ७१ जण गंभीर तर १११ जण किरकोळ जखमी झाले.

    संध्याकाळी ६ ते रात्री ९ पर्यंत येथे ५४ अपघातांपैकी ३४ मध्ये कुणीही जखमी नाही. तर शिल्लक २० अपघातात एकही मृत्यू नसला तरी ८ जण गंभीर तर ३५ जण किरकोळ जखमी झाले. रात्री ९ ते रात्री १२ पर्यंत येथे ५९ अपघातांपैकी ३१ मध्ये कुणीही जखमी नाही. शिल्लक २८ अपघातांत १० मृत्यू तर ५ जण गंभीर तर ३५ जण किरकोळ जखमी झाल्याचेही महामार्ग पोलिसांच्या अहवालात पुढे आले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    आसाममध्ये सुखोई-३० एमकेआय विमान कोसळले; नागपूरचे सुपुत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर वीरमरण पावले

    March 6, 2026

    Devendra fadnavis : 78,215 मेगावॅट वीज निर्माणासाठी जलविद्युत प्रकल्पाला ग्रीन सिग्नल

    March 5, 2026

    Budget 2026 : अर्थसंकल्प 2026: निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा; स्वस्त काय, महाग काय?

    February 1, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.