Incident in Jalgaon taluka: तरूणीचा विनयभंग : जळगाव तालुक्यातील घटना

0
9

जळगाव तालुका पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या एका २५ वर्षीय तरूणीचा हात पकडून विनयभंग केल्याची घटना रविवारी, १८ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. दरम्यान, याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर असे की, जळगाव तालुक्यातील एका गावात २५ वर्षीय तरूणी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. तिच्या गावात राहणारा प्रभाकर खंडू महाले (वय ४०) हा १८ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पीडित तरुणी ही घरात एकटी होती. तेव्हा तिच्या घरात घूसून तिचा हात पकडून तिला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून तिचा विनयभंग केला.

तरुणीने घेतली पोलिसात धाव

दरम्यान, याप्रकरणी पीडित तरूणीने जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी प्रभाकर महाले याच्याविरुध्द जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here