बीडला ६१ वी पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्यावतीने २०२५-२६ साठी आयोजित ६१ वी पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा बीड येथे होत आहे. स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा पुरुष व महिला संघ सहभागी होत आहे. दोन्ही संघांच्या कर्णधारपदी अनुक्रमे मोहित गुंजकर, किरण बोदडे यांचा निवडीत समावेश आहे.
जळगाव जिल्हा संघाची निवड प्रक्रिया निवड समितीचे सदस्य दत्तात्रय महाजन, दिलीप चौधरी, विशाल पाटील, निखिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंना संघटनेचे पदाधिकारी आ.प्रा. चंद्रकांत सोनवणे, प्रा. डी. डी. बच्छाव, उदय पाटील, एन. डी. सोनवणे, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त गणपतराव पोळ, प्रा. श्रीकृष्ण बेलोरकर, सुनील समदाने, राज्य सहसचिव जयांशु पोळ, विद्या कलंत्री, जिल्हा सचिव राहुल पोळ यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
स्पर्धेसाठी पुरुष संघात मोहित गुंजकर (कर्णधार), कमलेश्वर पावरा, प्रथमेश कंखरे, रोहित कोळी, दिव्यांशू ऐशी, तेजस चौधरी, हिमांशू पाटील, दर्शन भावसार, मोहित महाले, संजय पावरा, रुद्राक्ष माळी, प्रणव जोगी, जयेश धनगर, चेतन भोई, नामानसिंग पाटील तसेच प्रशिक्षक गोपाळ पवार तर व्यवस्थापक स्वप्नील कोळी यांचा समावेश आहे.
महिला संघात किरण बोदडे (कर्णधार), नंदिनी पाटील, हर्षाली परदेशी, जान्हवी राठोड, तनिष्का वाघ, लावण्या शिंदे, माहेश्वरी सोनवणे, प्रियंका साळी, पूर्वा पाटील, कल्याणी पाटील, भावना शिंदे, सिद्धी काळे, संजीवनी भिल, दिव्या पवार, प्रशिक्षक यशवंत लांबोळे, व्यवस्थापक स्नेहल गायकवाड यांचा समावेश आहे. जळगाव जिल्ह्याच्या दोन्ही संघांकडून राज्य पातळीवर उत्कृष्ट कामगिरी होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
