नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगात आज पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे.या सुनावणीपूर्वी शरद पवार गटाला दिलासा देणारी बाब समोर आली आहे. सुप्रीम कोर्टाने केरळ हायकोर्टाने ३ ऑक्टोबर रोजी खासदार मोहम्मद फैजल यांंना दोषी ठरवले होते. त्यामुळे त्यांंची खासदारकी निलंबित करण्यात आली होती. खून करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी त्यांंना दोषी ठरवण्यात आले होते मात्र, सुप्रीम कोर्टाने आज त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे.
न्यायमूर्ती ऋषीकेष रॉय आणि न्यायमूर्ती संजय करोल यांच्या खंंडपीठात ही सुनावणी पार पडली. मोहम्मद फैजल यांच्यावतीने कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. सुप्रीम कोर्टाने मोहम्मद फैजल यांना पुन्हा एकदा खासदारकी दिली आहे.
शरद पवार गटाला दिलासा
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये २ जुलै रोजी अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात मंत्रिपदाची शपथ घेतल्याने फूट पडलेली आहे.अजित पवार गटाने पक्षावर दावा सांंगत निवडणूक आयोगात धाव घेतली आहे.निवडणूक आयोगात सुनावणी सुरु होण्यापूर्वी मोहम्मद फैजल यांची खासदारकी रद्द झाल्याने शरद पवार गटाला धक्का बसला होता. मात्र, आज पुन्हा सुप्रीम कोर्टाने मोहम्मद फैजल यांना खासदारकी दिल्याने दिलासा मिळाला आहे.
फैजल यांना दुसऱ्यांदा
खासदारकी बहाल
लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल यांना २००९ मधील एका खूनाच्या प्रकरणात शिक्षा झाल्यानंतर त्यांची खासदारकी रद्द झाली होती. शिक्षेला स्थगिती मिळाल्यांनतर मोहम्मद फैजल यांना लोकसभेची खासदारकी पुन्हा मिळवण्यासाठी सुप्रीम कोर्टात जावे लागले होते.त्यानंतर लोकसभा सचिवालयाने खासदारकी बहाल केली होती.३ ऑक्टोबरला केरळ हायकोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर त्यांचं पुन्हा एकदा निलंबन करण्यात आले होते.आता पुन्हा एकदा मोहम्मद फैजल यांना सुप्रीम कोर्टातून दिलासा मिळाल्याने खासदारकी मिळणार
आहे.