विद्यापीठातर्फे ‘फिरती विज्ञान प्रयोगशाळाची व्हॅन’
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान केंद्राच्या वतीने नंदूरबार जिल्हयातील सहा माध्यमिक शाळेतील व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘फिरती विज्ञान प्रयोगशाळाची व्हॅन’ उपलब्ध करून देण्यात आली. दोन दिवसात २७०० विद्यार्थ्यांनी त्याचा फायदा घेतला.
विज्ञानात गोडी निर्माण व्हावी यासाठी ही विज्ञान प्रयोगशाळा व्हॅन नंदूरबार जिल्ह्यातील शहादा, धडगाव या तालुक्यातील शेठ वि.के. शाह विद्यालय, शहादा, कै. सौ. जी.एफ. पाटील कनिष्ठ महाविद्यालय, शहादा , एस.टी.ई.एस आणि सहकारी शिक्षण संस्था विज्ञान महाविद्यालय, शहादा. धडगाव तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा, चुलवड, शासकीय आश्रमशाळा, मंडवी बुद्रुक आणि शासकीय आश्रमशाळा, काकरदा येथील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली.
फिरती विज्ञान प्रयोगशाळा बस मधील ३० पेक्षा जास्त प्रयोगांचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. २७०० विद्यार्थ्यांनी व ग्रामस्थांनी ही व्हॅन पाहिली. प्रा. एस.आय. पाटील, प्रा. संदीप मराठे, उल्हास सोनवणे, प्रा. आय.जे. पाटील, कार्तिक शेल्के, गौरव पाटील, राहुल हजारी आणि ऋषिकेश चौधरी तसेच वाहनचालक मन्साराम राठोड यांनी सहकार्य केले अशी माहिती समन्वयक प्रा.एस.एस. घोष यांनी दिली.
जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्हयातील शाळांना सूचित करण्यात येते की, ज्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ‘फिरती विज्ञान प्रयोगशाळेच्या बस’ चा लाभ घ्यावयाचा असेल त्यांनी राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग, कवयित्री बहिणाबाई चोधरी महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावचे समन्वयक प्रा. एस.एस. घोष यांचेशी संपर्क करावा असे आवाहन केले आहे. संपर्क क्र. 8999545292 तसेच ई-मेल ssghosh@nmu.ac.in.