Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»‘MNS’ Ready Elections In Jalgaon : जळगावात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ‘मनसे’ सज्ज
    जळगाव

    ‘MNS’ Ready Elections In Jalgaon : जळगावात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ‘मनसे’ सज्ज

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoOctober 25, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जिल्हा बैठकीत संघटनात्मक तयारीसह निवडणूक रणनितीबाबत चर्चेसह मार्गदर्शन

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी : 

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि पक्ष नेते तथा माजी आमदार ॲड. जयप्रकाश बाविस्कर यांच्या अध्यक्षतेखाली पद्मालय विश्रामगृहात शनिवारी, २५ ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता जिल्हा बैठक पार पडली. बैठकीत आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची संघटनात्मक तयारी व निवडणूक रणनितीबाबत सविस्तर चर्चा झाली. जिल्ह्याभरातील सर्व १५ तालुक्यातील पदाधिकारी, शेतकरी सेना, महिला सेना, विद्यार्थी सेना आणि विविध अंगीकृत संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    बैठकीत ॲड. जयप्रकाश बाविस्कर म्हणाले की, आगामी निवडणुका म्हणजे संघटनशक्ती दाखवण्याची खरी वेळ आहे. प्रत्येक तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मतदार यादी नीट तपासावी, दुबार नावं व अनियमितता शोधून काढावी. जिल्ह्यातील रिक्त पदांची पुनर्नियुक्ती आणि आवश्यक संघटनात्मक बदल करून योग्य व्यक्ती योग्य ठिकाणी असावी, यासाठी जिल्हाध्यक्षांनी अहवाल तयार करावा.

    बैठकीत जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, अनिल वाघ, मुकुंदा रोटे व कमलाकर घारू यांनी आपल्या विभागातील संघटनस्थिती व निवडणूक तयारीचा आढावा सादर केला. यावेळी प्रत्येक प्रभाग आणि तालुका पातळीवर स्वतंत्र बैठक घेऊन जनसंपर्क अभियान, युवकांचा सहभाग आणि घराघरात मनसेचा संपर्क वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला.

    बैठकीचा शेवट करताना ॲड. जयप्रकाश बाविस्कर म्हणाले, मनसेची ओळख म्हणजे शिस्त, प्रामाणिकपणा आणि निडरपणे सत्यासाठी उभे राहणे, आगामी निवडणुकात मनसे हा पर्याय नाही तर आवश्यकता ठरेल. शेवटी जळगाव जिल्हा मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे यांनी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मार्गदर्शनासाठी उपस्थित राहिलेल्या ॲड. जयप्रकाश बाविस्कर यांचे आभार मानले.

    यांची होती उपस्थिती

    जिल्हा बैठकीला उपजिल्हाध्यक्ष संजय नन्नवरे, जळगावचे महानगर अध्यक्ष विनोद शिंदे, बोदवडचे अनिल गंगतीरे, जामनेरचे तालुकाध्यक्ष अशोक पाटील, एरंडोलचे तालुकाध्यक्ष विशाल सोनार, भुसावळचे शहराध्यक्ष राहुल सोनटक्के, ज्ञानेश्वर ठाकरे, राजेंद्र लिंगायत, जळगाव उपशहराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, राजेंद्र निकम, ललित शर्मा, प्रकाश जोशी, चेतन पवार, धरणगाव शहराध्यक्ष संदीप फुलझाडे, नशिराबाद शहराध्यक्ष जितेंद्र बऱ्हाटे, वाहतूक सेनेचे जिल्हा संघटक रजाक सय्यद, शेतकरी सेनेचे जिल्हा संघटक अविनाश पाटील, विद्यार्थी सेनेचे योगेश पाटील, कल्पेश पवार, ऐश्वर्य श्रीरामे, ॲड.सागर शिंपी, मंगेश भावे, भूषण तळेराव, समाधान माळी, रामकृष्ण पवार, कन्हैया पाटील, सतीश सैंदाणे, गणेश कुंभार, अमोल माळी, विनोद पाटील, हर्षल वाणी, संदीप मांडोळे, प्रदीप पाटील, शैलेश चौधरी, भूषण ठाकरे, राहुल चव्हाण, दिनेश मराठे, पवन कोळी, महेश सुतार, चेतन नैरानी, कृष्णा दुंडुळे, अरुण गव्हाणे, भूषण पाटील, भैय्या लिंगायत, प्रतीक सोनवणे, प्रतीक भंगाळे, प्रणय भागवत, वैभव सुरवाडे, दीपक सोनवणे, दशरथ सपकाळे, तुषार वाढे, अभिषेक बोरसे, रवी कोळी, करण गंगतीरे, सागर पाटील, विशाल कोळी, शुभम पाटील, वाल्मीक जगताप, सुनील माळी, महिला सेनेच्या अनिता कापुरे, लक्ष्मी भील यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon:अवैध गांजाची साठवणूक करणाऱ्याला संशयिताला अटक

    December 29, 2025

    Jalgaon:शेठ ला.ना.सार्व.विद्यालयात किशोर महोत्सवाचा बक्षीस वितरणाने समारोप

    December 29, 2025

    Jalgaon:रुग्णसेवेचे स्वप्न अपूर्णच…! नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीचा मृत्यू

    December 29, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.