मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पारंपरिक खेळांचे महत्त्व केले.
साईमत/यावल/प्रतिनिधी :
तालुक्यातील नायगाव येथील सातपुडा माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून लेझीम संच भेट देण्यात आला.
पारंपरिक क्रीडा आणि सांस्कृतिक वारसा जपणे,विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती आणि एकात्मता वाढविणे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष कल्पेश पवार, रुपेश तेली, पंकज कोळी उपस्थित होते. लेझीम स्विकारताना शाळेचे मुख्याध्यापक योगराज नायडे, उपशिक्षक विकास सूर्यवंशी, पी.व्ही.बोबडे, मनोज मोरे, श्री.तडवी यांच्यासह सर्व शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पारंपरिक खेळांचे महत्त्व, शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी नियमित व्यायामाची गरज आणि संस्कृती जपण्याचे मूल्य याबद्दल मार्गदर्शन केले. लेझीम संच मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून या लेझीम संच उपकरणाचा उपयोग शाळेतील दिंडी, रॅली, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये होणार आहे.महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने अशा अनेक उपयुक्त उपक्रमांचे आयोजन भविष्यातही सातत्याने करण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष कल्पेश पवार यांनी सांगितले.
