एमएमआयचे नेते ओवैसीनीं पोलीस अधिकाऱ्याला भरसभेत धमकावले

0
11

हैदराबाद : वृत्तसंस्था

अकबरुद्दीन ओवैसी हैदराबाद येथील ललिताबाग येथे प्रचारसभा घेत होते. यावेळी संतोषनगरच्या एका पोलीस निरिक्षकाने नेत्यांना सभा वेळेत आटोपण्याची सूचना केली. यामुळे एमआयएमचे नेते प्रचंड संतापले. भरसभेतच त्यांनी पोलीस अधिकाऱ्याला धमकी दिली.
ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन अर्थात एमआयएमचे नेते अकरबरुद्दीन ओवेसी यांनी भरसभेत पोलिसांना धमकावले आहे. पोलिसांनी वेळेत सभा बंद करण्याची सूचना केल्याने त्यांनी पोलिसांनाच दम भरला. तेलंगणात विधानसभा निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. अकबरुद्दीन ओवेसी तेलंगणातील चंद्रयानगुट्टा येथून निवडणूक लढवत आहेत.
“चाकू आणि गोळ्यांचा सामना केल्यामुळे मी कमजोर झालोय असं वाटतंय का तुम्हाला? माझ्यात अजूनही हिंमत आहे. पाच मिनिटे अजून उरली आहेत, मी आणखी पाच मिनिटे बोलणार. कोणी मायका लाल जन्माला आलेला नाही, जो मला थांबवू शकेल”, असे अकबरुद्दीन ओवेसी म्हणाले.
त्यांनी लोकांना संबोधून विचारले की, मी बरोबर बोललो ना? जर मी इशारा दिला तर तुम्हाला इथून जावं लागेल की आम्ही तुम्हाला पळवू? आम्हाला कमजोर करण्यासाठी हे लोक इथे येत असतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here