सावद्यात आमदार कन्येने केले ११० फूटी तिरंग्याचे ध्वजारोहण

0
8

साईमत, सावदा, ता.रावेर : वार्ताहर

सावदा नगर पालिकेच्या १०० वर्षाच्या इतिहासात १९८४ मध्ये प्रथम वेळी लागलेल्या प्रशासकीय राजवटमध्ये मुख्याधिकारी भोंगळे यांना ध्वजारोहण करण्याचा बहुमान प्राप्त झाला होता. २०२१-२२ मध्ये दुसऱ्यांदा लागलेल्या प्रशासकीय राजवटमध्ये २६ जानेवारी २०२४ रोजी मुख्याधिकारी हर्षल सोनवणे यांना ध्वजारोहण करण्याचा बहुमान मिळाला आहे.

शहरातील बसस्थानक परिसरात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याजवळ प्रजाकसत्ताक दिनाचे औचित्य साधुन आ. चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून मंजुर ११० फुटी राष्ट्रध्वज लोकार्पण सोहळ्यात आ.चंद्रकांत पाटील यांची कन्या संजना पाटील यांना ध्वजारोहणाचा प्रथम बहुमान मिळाला. याप्रसंगी रावेर लोकसभा निवडणूक प्रमुख नंदकिशोर महाजन, संजना पाटील, डॉ. अतुल सरोदे, मुख्याधिकारी हर्षल सोनवणे, एपीआय जलींदर पळे, शिवसेना शहरप्रमुख सूरज उर्फ बद्री परदेशी, सारिका चव्हाण, रेखा बोंडे, हेमांगी चौधरी, नंदा लोखंडे, रमाकांत तायडे, वेडू लोखंडे, दीपक बडगे, सोहेल खान, पत्रकार बांधव यांच्यासह युवक बौध्द पंच ट्रस्टचे सदस्य, शहरवासी उपस्थित होते.

सावदा येथील डायमंड इंग्लिश मीडियम शाळा, श्री.आ.ग.हायस्कुल, ना.ना.साहेब विष्णू हरी कन्या शाळा, न.पा.उर्दू मुला-मुलींची शाळा, मराठी न.पा.मुला-मुलींची शाळा, अँग्लो उर्दू हायस्कुल यांच्यासह नगरपालिका, पोलीस स्टेशन, वीज महावितरण कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, शहीद अब्दुल हमिद स्मारक आदी ठिकाणी संबंधित मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करून प्रजासत्ताक दिवस उत्साहाने साजरा करण्यात आला.

सावदा येथे डायमंड इंग्लिश मीडियम स्कुल येथे शाळेचे संस्थापक तथा हाजी इक्बाल हुसैन मल्टीपर्पज फाउंडेशनचे सचिव हाजी शेख हारूण शेख इक्बाल, नगरपालिका येथे मुख्याधिकारी हर्षल सोनवणे, पोलीस स्टेशन येथे एपीआय जलींदर पळे, श्री.आ.ग.हायस्कुल येथे शाळेचे मुख्याध्यापक सी.सी.सपकाळे, ना.ना.साहेब विष्णू हरी पाटील कन्या शाळा येथे मुख्याध्यापिका प्रमिला ठोंबरे, अल्कवी उर्दू खासगी शाळा येथे आदर्श शिक्षक ताथ शाळा संस्थाचे सचिव अय्युब खान, वीज महावितरणच्या कार्यालयात कार्यकारी अभियंता गोरखनाथ सपकाळे, सार्वजनिक बांधकाम विभागात उप अभियंता यांनी आपापल्या कार्यालयात शिक्षक वृंद व कर्मचारी सह शहरातील मान्यवर यांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

यानंतर शहरात शेखपुरा येथे शहीद अब्दुल हमीद यांचे स्मारकवर सालाबादप्रमाणे यंदाही मुख्याधिकारी हर्षल सोनवणे, एपीआय जलींदर पळे, माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, नगरसेवक राजेंद्र चौधरी, अल्लाबक्ष उर्फ गुड्डू मेंबर, नगरसेविका नंदा लोखंडे, सिद्धार्थ बडगे, शहीद अब्दुल हमीद संस्थेचे उपाध्यक्ष फिरोज खान, कादर खान यांनी पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली. तसेच श्री आ.ग.शाळेचे एन.सी.सी.अधिकारी संजय महाजन यांनी शहीद अब्दुल हमीद यांच्याबद्दल उपस्थितांना माहिती देवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी स्मारकास सलामी देऊन परेड प्रदर्शन केले. यावेळी पत्रकार युसूफ शाह, फरीद शेख यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here