यावल न.प.च्या मुख्याधिकाऱ्यांकडून बगीचा देखभाल दुरुस्तीत घोळ

0
62

साईमत, यावल : प्रतिनिधी

येथील नगरपरिषद हद्दीतील बगीचा देखभाल दुरुस्ती करण्याबाबत जी निविदा काढण्यात आली. त्यात दर महिन्याला अंदाजे २० हजार रुपये बिल ठेकेदाराला प्राप्तीसाठी एकाच गट नंबरमधील बगीचा दोन वेगवेगळ्या नावाने निविदा काढण्याचा घाट, कुटिल डावपेच यावल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आणि नगरपरिषदेचे स्थापत्य अभियंता यांनी रचल्याचे समोर आले आहे.

१० जानेवारी २०२४ रोजी प्रसिद्ध झालेल्या वार्षिक सर्वसाधारण निविदेमधील अ.क्र.१५ आणि अ.क्र.१७ चे प्रत्यक्ष वाचन केले असता यावल नगरपरिषद हद्दीतील गट क्र.३३ व्यासमंदिर येथील बगीच्या देखभाल दुरुस्ती करणे व अ.क्र.१७ चे अवलोकन केले असता यावल नगरपरिषद हद्दीतील गट क्र.३३ महादेव मंदिर येथील बगीचा देखभाल दुरुस्ती करणे असा स्पष्ट उल्लेख आहे.

गट क्रमांक ३३ मध्ये फक्त एक बगीचा असून जाहिरातीत एकाच बगीचाला दोन नाव देण्याचा उद्देश काय..? म्हणजे एका बगीचाचे दोन वेगवेगळे बिल काढण्याचा घाट होता का? असा प्रश्‍न यावल शहरासह संपूर्ण तालुक्यात उपस्थित केला जात आहे. यावल नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्या स्वाक्षरीने निविदा कार्यारंभ आदेश प्रसिद्ध होत असले तरी स्थापत्य अभियंता यांनी यावल नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांची दिशाभूल आणि फसवणूक करून ठेकेदारांशी हात मिळवणी केली आहे का? असाही प्रश्‍न उपस्थित होत आहे.

यावल नगरपरिषद हद्दीत अनेक ठिकाणी यावल नगर परिषदेने बगीचे तयार केलेले आहेत. त्या बगीच्यामध्ये नियमित दररोज साफसफाई करणे, केरकचरा काढणे, फुलझाडे, फळझाडे लावणी व लॉनला पाणी देणे, झाडाची कटिंग करणे व बगीचा आहे. त्या परिस्थितीत मेंटेन ठेवणे व बगीचाच्या ठिकाणी कमीत कमी दोन माणसे ठेवून देखरेख करणे बगीचाचे काही नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी ठेकेदाराची राहील. याबाबत यावल नगरपरिषद प्रत्यक्ष काय खात्री करते का? याबाबतही यावल शहरात आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे. प्रत्येक बगीच्यावर कोणकोणत्या ठेकेदाराला किती पेमेंट दिले गेले? आणि संबंधित ठेकेदाराने जीएसटीसह वेगवेगळे कर शासनाकडे भरले आहेत किंवा नाही त्याची चौकशीही होणे आवश्‍यक झाले आहे. असे न झाल्यास संबंधित स्थापत्य अभियंत्यासह मुख्याधिकारी कायदेशीर अडचणीत येणार असल्याचे सुद्धा चर्चिले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here