Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»धरणगाव»निवडणुकीच्या कामात कुचराई भोवली, गैरहजर ३० कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल
    धरणगाव

    निवडणुकीच्या कामात कुचराई भोवली, गैरहजर ३० कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoMay 15, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, पाळधी, ता.धरणगाव ः वार्ताहर

    निवडणुकीच्या कामावर गैरहजर असलेल्या ३० कर्मचाऱ्यांवर कामात कुचराई केल्याप्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी जळगाव ग्रामीणचे निवडणूक नायब तहसीलदार दिगंबर भिकन जाधव यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी जळगाव ग्रामीणचे सहाय्यक निवडणूक अधिकारी यांच्या आदेशाने गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

    बांभोरी शिवारातील कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठात १२ मे रोजी नियुक्त कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे साहित्य घेण्यासाठी बोलाविण्यात आले होते. त्यानंतर कर्मचारी आणि अधिकारी साहित्य घेऊन रवाना झाले होते. मात्र, त्यापैकी काही जण प्रत्यक्ष मतदान केंद्रावर हजर नव्हते. नियुक्त केलेल्या ठिकाणी १२ रोजी कर्मचारी गैरहजर होते. यासाठी त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी, जळगाव ग्रामीणचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हाधिकारी भूसंपादन यांची कोणतीही पूर्व परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१चे कलम १३५ अन्वये निवडणूक कर्तव्यात टाळाटाळ करणे, नेमलेल्या ठिकाणी गैरहजर राहणे यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास स.पो.नि.सचिन शिरसाठ आणि त्यांचे सहकारी करीत आहेत.

    गुन्हा दाखल केलेल्यांमध्ये यांचा आहे समावेश

    गुन्हा दाखल केलेल्यांमध्ये मतदान केंद्राध्यक्ष (पीआरओ) प्रशांत सुभाष शेलाई (गणेशपूर, ता.चाळीसगाव), सुनील दिनकर चाऊक (मांडळ, ता.अमळनेर), दीपक गणपत आवटे (चाळीसगाव), शेख अजमोद्दिन शेख जैनोद्दिन (भडगाव), विलास गोकुळ पाटील (सावखेडे, ता.पारोळा), जितेंद्र बाबुलाल पाटील (कळवण तांडा, ता.भडगाव), रमेश यादव पाटील (जळगाव), घनश्‍याम मगन ईसई (वडगाव, ता.पाचोरा), भगवान भिका सुरवाडे (अमळनेर), विलास यादव नेरकर (बदरखे तांडा, ता. पाचोरा), नागसेन जालम बागुल (पारोळा), किरण पोपट महाजन (चाळीसगाव), विजय दगा पाटील (राजदेहरे सेत, चाळीसगाव), गुलाबराव किसन चव्हाण (सार्वे पिंप्री, ता.पाचोरा), संजीव यशवंत नागरे (राजदेहरे तांडा, ता.चाळीसगाव), नरेंद्र शंकर जोशी (पाचोरा), मतदान अधिकारी १ (एफपीओ) प्रमोद दत्तात्रय पाठक (एरंडोल), सतीश पतंगराव पाटील (देवळी, ता.चाळीसगाव), राजू उत्तम राठोड (पाचोरा), रमेश मोहन पाटील (हिरापूर, ता.चाळीसगाव), रवींद्र रामराव देवकर (दहिवद, ता.चाळीसगाव), मतदान अधिकारी २ (ओपीओ) संजय उत्तम पाटील (पाचोरा), रणधीर सीताराम वाघ (जळगाव), राकेश गणपत कंजरभाट (जळगाव), सुनील नानू नगराळे, विजय नाना पाटील (अमळनेर), अजित तानसिंग चव्हाण (भडगाव), भाऊसाहेब विश्‍वास पाटील (महिंदळे, ता.भडगाव), राहुल बाळू भामरे (अंतुर्ली, ता.पाचोरा), विजय साहेबराव घोडेस्वार (बहाळ, ता.चाळीसगाव), गणेश सदाशिव सोनार (जळगाव) यांचा समावेश आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon : जळगाव जिल्हा परिषदेतील बोगस दिव्यांग प्रकरण : दोन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

    January 9, 2026

    Dharangaon : विदेशी नागरिक कायद्याचे उल्लंघन; दोन आरोपींना अटक

    January 9, 2026

    Paladhi, Dharangaon Taluka:रेल येथे वाळू माफीयांचा शेतकऱ्यांवर हल्ला

    January 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.