Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात अल्पसंख्यांक समाज सरसावला
    जळगाव

    जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात अल्पसंख्यांक समाज सरसावला

    saimatBy saimatJune 17, 2024Updated:June 17, 2024No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : सुरेश उज्जैनवाल
    नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच यावेळी मुस्लिम व बहुजन समाज अत्यंत तडफदाररित्या मतदानाला बाहेर पडल्याचे चित्र समोर आले. लोकशाही टिकवणे आणि ‘संविधान बचाव’ या मुद्द्यावर भाजपाविरोधी ही निवडणूक गाजली असली तरी मुस्लिम- अल्पसंख्यांक समाजात पसरलेल्या भीतीवर उत्तर म्हणून त्यांच्या उत्स्फूर्त मतदानाने एकगठ्ठा मतदानाची ताकद दिसून आली.मतदानाच्या आकडेवारीवर विवेचन करत येत्या विधानसभा निवडणुकीत सामाजिक समीकरणाच्या जोरावर जिथे स्वतःच्या समाजाची ‘वोट बँक’ आहे तिथे मुस्लिम अल्पसंख्यांक समाजाच्या इच्छुकांची चर्चा व मोर्चेबांधणी सुरु झाली आहे.
    ——————————————————————————————————-
    लोकसभेत गायब असलेल्या कथित पुढाऱ्यांना सुद्धा आमदारकीचे वेध
    जळगाव लोकसभा मतदार संघात भाजपा विरुद्ध उबाठा उमेदवारांमध्ये प्रचारात दिसलेल्या अत्यंत चूरशीच्या लढाईत मुस्लिम समाजाची भूमिका निश्चितच महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या बाजूची असतांना ऐनवेळी या समाजातील शिक्षणसम्राट आणि एका बड्या नेत्याने आपल्या भावासह लपंडाव खेळला.या नेत्याला महाविकास आघाडीसोबत दिसायचे नाही अन्यथा संकट येईल,असा ईशाराच दिला गेल्याने लोकसभेत हा माणूस समाजाला वाऱ्यावर सोडून गायब होता. आता हाच नेता आपल्या भावाला विधानसभेच्या शर्यतीत पुढे करत आहे.तथापि सद्या हे दोघेही बंधु मुस्लिम समाजाचा ओढा असलेल्या महाविकास आघाडी किंवा एमआयएम अशा कोणत्याच राजकीय पक्षात सक्रिय नसल्याने नेमकी उमेदवारी आणातील कुठून ? असा सवाल व्यक्त केला जात असून दुसरीकडे सोशल मीडियावर धर्मगुरू मुफ्ती यांना मिळत असलेले समर्थनामुळे त्यांच्या उमेदवारीसाठी अचानक आग्रह सुरू झाल्याने या बड्या नेत्यासह त्यांचा बंधु मात्र कमालीचे अस्वस्थ दिसत आहेत.
    ——————————————————————————————————-
    मुस्लिम धर्मगुरू मुफ्ती हारून नदवी यांच्या नावाची चर्चा

    गेल्यावेळी २०१९ मध्ये भाजपा आणि शिवसेना युतीत ही जागा भाजपाच्या वाट्याला गेल्याने विद्यमान आ. राजुमामा भोळे हेच उमेदवार राहिले होते तर काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडीत राष्ट्रवादीला जागा मिळाल्याने अभिषेक पाटील यांनी उमेदवारी केली होती.त्यापूर्वी २०१४ मध्ये भाजपा – शिवसेना स्वतंत्र लढल्याने शिवसेनेकडून सुरेशदादा जैन आणि भाजपाकडून राजुमामा अशी लढत झाली असतांना काँग्रेस -राष्ट्रवादीच्या आघाडीत डॉ. राधेशाम पाटील काँग्रेसचे उमेदवार होते.दरम्यान,जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाची यावेळी महाविकास आघाडीच्या वाट्यातील जागा राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस आपल्या ताब्यात राखण्यासाठी आग्रही राहणार आहे.त्यात काँग्रेसकडून जिल्हा उपाध्यक्ष धर्मगुरू मुफ्ती हारून नदवी यांनी निवडणूक रिंगणात उतरावे म्हणून त्यांना सोशल मीडियातून विशेषतः मुस्लिम समाजाच्या प्रमुख जिम्मेदार लोकांचा सहभाग असलेल्या “JALGON SOCIAL” या ग्रुपवर आग्रह करणारी चर्चा सुरु आहे.आपल्या तडाखेबाज राजकीय व सामाजिक भाषणाच्या आणि सौम्य शैलीच्या धार्मिक प्रवचनांच्या जोरावर जिल्ह्यात व राज्यसह उत्तर प्रदेश,बिहार तसेच गुजरात आणि मुंबईतील अनेक भागात मुस्लिम धर्मगुरू मुफ्ती हारून यांनी आपली ओळख निर्माण केली आहे.

    याशिवाय नदवी टाइम्सच्या व्हायरल न्यूज या यु -ट्यूब चॅनलवर प्रासंगीक तसेच प्रभावी लकबीच्या शब्दफेक असलेला ‘संपादक’ म्हणून त्यांना पसंती मिळाली आहे.अगदी अल्पवधित त्यांच्या या चॅनलचे अठरा लाख सबस्क्रायबर आणि लाखो विव्हर्स आहेत हे विशेष. पत्रकारांच्या व्हाईस ऑफ मीडिया या संघटनेच्या उर्दू विंग्सचे राष्ट्रीय अध्यक्ष पदावर सुरु असलेली उजवी कारकीर्द ही सुद्धा त्यांच्या जमेची बाजू आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Jalgaon : मतमोजणी केंद्रावर पत्रकारांवर पोलिसी दंडुकेशाही

    January 19, 2026

    “सत्तासंघर्ष थांबला! यावल नगरपरिषद समिती सभापती निवडीत ऐतिहासिक समझोता”

    January 19, 2026

    “जळगावमध्ये वाहतुकीला नवसंजीवनी! गिरणा नदीवर ७९ कोटींच्या नवीन बांभोरी पुलाला मंजुरी”- खा स्मिता वाघ

    January 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.