Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»जामनेर»मंत्री गिरीषभाऊ महाजन, दिलीप खोडपे सर यांनी विजयासाठी घातले भवानी मातेला साकडे
    जामनेर

    मंत्री गिरीषभाऊ महाजन, दिलीप खोडपे सर यांनी विजयासाठी घातले भवानी मातेला साकडे

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoNovember 5, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    दोघांमधील लढत रंगतदार ठरणार

    साईमत/जामनेर /प्रतिनिधी

    विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात जामनेर मतदार संघात दहा उमेदवार रिंगणात असले तरी महायुतीचे सातव्यांदा उमेदवारी करीत असलेले मंत्री गिरीषभाऊ महाजन यांच्या विरूद्ध महाविकास आघाडीचे दिलीप खोडपे सर यांच्यातच खरी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मंत्री गिरीषभाऊ महाजन यांच्या हस्ते तालुक्यातील वाडीकिल्ला येथील जागृत देवस्थान मंदीर म्हणून परिचित असलेले तथा याच मंदिराच्या ट्रस्टचे अध्यक्ष गिरीषभाऊ महाजन यांनी येथे नारळ वाढवून विधानसभेच्या प्रचाराचा शुभारंभ केला.

    यावेळी सौ.साधना महाजन, संजय गरूड, ॲड.शिवाजी सोनार, सेवानिवृत्त अभियंता जे.के.चव्हाण, जितेंद्र पाटील, चंद्रकांत बाविस्कर, गोविंद अग्रवाल, प्रदीप लोढा, नवलसिंग पाटील, विलास पाटील, राजमल भागवत, कैलास पाटील, अशोक भोईटे, डॉ. प्रशांत भोंडे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

    जळगाव-छत्रपती संभाजी नगर मार्गालगतच्या सुनसगाव फाटा येथील भवानी मातेच्या मंदिरात महाविकास आघाडीचे उमेदवार दिलीप खोडपे सर यांच्या हस्ते नारळ वाढवून त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. दोन्ही उमेदवारांनी आपआपल्या परीने विजयासाठी भवानी मातेला साकडे घातले आहे. यावेळी सौ.विद्याताई खोडपे, डी.के.पाटील, शंकर राजपूत, ॲड.ज्ञानेश्वर बोरसे, डॉ.मनोहर पाटील, किशोर पाटील, डॉ.प्रशांत पाटील, जगदेव बोरसे, दिलीप पाटील, प्रल्हाद बोरसे, दत्ता साबळे, अनिल पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    दोघांचे गाव भेटीवर लक्ष केंद्रीत

    होऊ घातलेल्या २० तारखेच्या निवडणुकीत भवानी माता कोणत्या उमेदवाराच्या पारड्यात विजयश्रीची माळ टाकते, हे निकालाच्या दिवशी म्हणजे २३ तारखेलाच समजणार आहे. दोन्ही उमेदवारांनी गाव भेटीवर लक्ष केंद्रीत केले आहे. तसेच मतदारांना प्रत्यक्ष भेटून प्रचाराला सुरुवात केल्याचे सद्यस्थितीला चित्र आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    ‘जाते जाते तुमने, आवाज़ तो दी होगी…’ अजितदादांच्या शोकसभेत सर्वपक्षीय नेत्यांचे अश्रू अनावर; वरळी डोममध्ये भावनांचा पूर

    February 23, 2026

    Paladhi Taluka Jamner:जळगावचा तरुण चेन्नई समुद्रात बेपत्ता; कुटुंबात शोककळा

    February 23, 2026

    Jamner : जामनेरमध्ये एकाला चौघांकडून बेदम मारहाण

    February 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.