मंत्री गिरीष महाजनांची धडाडी कौतुकास्पद

0
17

जलपर्यटनातून दहा हजार जणांनी अनुभवला हर्षोल्लास

सुरेश उज्जैनवाल

राज्याच्या पर्यटन विकास विभागातर्फे सध्य जळगाव शहरातील मेहरुण तलावावर सुरु असलेला ‘ॲक्वा फेस्ट’ जलपर्यटन महोत्सव एक आल्हाददायक वातावरणाची निर्मिती करणारा आणि लोकांना विशेषत: युवक, अबालवृद्ध, दिव्यांग अशा सर्वच घटकांना निखळ आनंदाची अनुभूती करुन देणारा ठरत आहे. राज्याचे पर्यटनमंत्री गिरीष महाजन यांनी कोणतीही पूर्व घोषणा किंवा फारसा गाजावाजा न करता राज्यातील पहिलाच ‘ॲक्वा फेस्ट’ जलपर्यटन महोत्सव व तोही जळगावमधून प्रारंभ करुन सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. या जलपर्यटन महोत्सवातंर्गंत मेहरुण तलावाच्या जलाशयात प्रत्यक्ष बोटींगचा आनंद गेल्या चार दिवसात तब्बल दहा हजार जणांनी घेतला. हर्षोल्हासाचा हा महोत्सव आनंदाची निर्मिती करण्यासह मंत्री महाजन यांच्या धडाडीची ही प्रचिती करुन देणारा ठरत आहे.

पर्यटनास उद्योगाचे स्वरुप देण्यासाठी पर्यटन विकास महामंडळाकडून अनेक मोठे प्रकल्प राज्यात सुरु आहेत. जलस्त्रोत, लेण्या, किल्ले, वने बऱ्यापैकी उपलब्ध आहेत. राज्यातील पर्यटन स्थळांचा अभ्यास करुन नवे पर्यटन धोरण विकसित करण्याचे धोर आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्या धोरणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी जळगाव शहरातील मेहरुण तलावाच्या जलाशयातून झाली, ही मोठी बाब आहे. मेहरुणच्या जलक्रीडा पर्यटनाच्या विकासासाठी १५ कोटी रुपयांच्या घोषणेसह मेहरुण तलावाच्या सुशोभिकरणासाठी २० कोटींचा निधी देण्याचेही मंत्री महाजन यांनी जाहीर केले आहे. मेहरुण तलावाच्या इतिहासात असे प्रथमच घडले की, राज्यस्तरीय महोत्सवाची सुरुवात येथून व्हावी.

एका अर्थाने मेहरुण तलावाचे सौंदर्य आता वाढणार आहे. वास्तविक मेहरुण तलावात साजरा केला जात असलेला ‘ॲक्वा फेस्ट’ २ ते ४ ऑक्टोंबर असा फक्त दिवसांसाठीच होता. मात्र, सर्वच स्तरातून मिळणारा वाढता प्रतिसाद आणि लोकांमध्ये निर्माण झालेला आनंद लक्षात घेता ६ ऑक्टोंबरपर्यंत हा महोत्सव सुरु राहणार आहे.

आठ प्रकारच्या बोटी

मेहरुण तलावावर विविध प्रकारच्या आठ बोटी महोत्सवानिमित्त तैनात केल्या आहेत. त्यात प्रामुख्याने ‘पॉन्टून बोट’, ‘बनाना राईडस’, ‘जेटस्की’, ‘वॉटर झोरबी’, ‘इलेक्ट्रीक, ‘शिकारा बोट’, ‘डोनट/लेझर बोट’, ‘वॉटर सायकल’ (स्पीड बोट) आदींचा समावेश आहे.

फक्त २० रुपयात मिळतोय आनंद

मंत्री गिरीष महाजनांच्या पुढाकाराने जळगावकरांना वॉटर बोटींगचा आनंद अनुभवता येत आहे. फक्त २० रुपये चार्ज आकारला जात आहे. वास्तविक स्पीड बोट, शिकारा बोट, वॉटर झोरबी यासह ज्या बोटी मेहरुण तलावाजवळ उपलब्ध केल्या गेल्या आहेत. त्या बोटींचा इतर जलपर्यटनस्थळी आकारला जाणारा चार्ज ४०० ते ५०० रुपये आहे. त्या तुलनेत मेहरुणमधील बोटींचा आनंद फक्त २० रुपयात घेता येत आहे. मेहरुण जलाशयातील बोटींचा साहसी खेळ अनुभवल्यानंतर मेहरुण तलावात हे जलपर्यटन प्रकल्प कायमस्वरुपी राबविणार आहे.

महाजन कृत स्पीड बोटचा थरार

‘ॲक्वा फेस्ट’ महोत्सवाचे उद्घाटन करुन केवळ फित कापण्यापुरते नव्हे तर स्वत: मंत्री गिरीष महाजन यांनी ९० किलोमीटर वेग असलेल्या बोटीचा थरार अनुभवला. स्पीड बोट चालवत तलावात तीन फेऱ्या स्वत: मारुन तरुणांना आकर्षित केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here