जामनेरला दिव्यांगांनी घेतली मंत्री गिरीष महाजन यांची भेट

0
122

दिव्यांगांच्या प्रश्नांसह मागण्या सोडविण्याची केली मागणी

साईमत/जामनेर/प्रतिनिधी

येथील मंत्री गिरीष महाजन यांच्या निवासस्थानी रविवारी, ६ ऑक्टोबर रोजी त्यांची भेट घेऊन दिव्यांगांच्या विविध मागण्यांचा पाढा वाचला. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून दिव्यांगांना पगार नाही. नगरपालिकेकडून पाच टक्के निधी अद्यापही मिळालेला नाही. पगार वाढ झालेली नाही. यासंदर्भात तात्काळ उपाययोजना करावी, यासाठी लवकरात लवकर दिव्यांगांना पाच टक्के निधी, सहा हजार रुपये पेन्शन मिळाली पाहिजे, अशा प्रमुख मागण्यांचे निवेदन मंत्री ना.गिरीष महाजन यांना देण्यात आले.

निवेदन देतेवेळी विश्वशांती दिव्यांग बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष पवन माळी यांनी मंत्री महाजन यांच्याशी चर्चा करुन दिव्यांगांचे प्रश्न आणि मागण्या त्वरित सोडविण्यात याव्या, अशी मागणी केली. यावेळी रवी झाल्टे, मोहन सुरवाडे, गणेश साळुंखे, अंबिकाबाई टहाकळे, रफिक भाई, जावेद भाई, कैलास रोकडे यांच्यासह दिव्यांग बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here