‘पाडळसरे’ धरणासाठी मंत्री अनिल पाटील, माजी आ.साहेबराव पाटील एकत्र लढा देणार

0
150

अमळनेर तालुक्याला सुजलाम्‌-सुफलाम्‌ करणारा ‘पाडळसरे’ प्रकल्प

साईमत/न्यूज नेटवर्क/अमळनेर :

तालुक्याला सुजलाम्‌-सुफलाम्‌ करणारा सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे पाडळसरे प्रकल्प. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मंत्री अनिल पाटील यांनी जोमाने प्रयत्न करून निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यासाठी माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील हे नेहमीच प्रयत्नशील आहेत. जो कोणी पाडळसरे धरणासाठी निधी आणेल, त्याला माझी साथ राहील. म्हणून कृषीभूषण साहेबराव पाटील यांनी मंत्री अनिल पाटील यांच्याबरोबर धरणाचे काम पूर्ण करण्यासाठी एकत्र लढा देणार असल्याचे सांगितले.

यावेळी लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष पुष्पलता पाटील यांच्यासह मा. नगरसेवक, अनिलदादा मित्र परिवारातील आणि माजी कृषीभूषण साहेबराव मित्र परिवार उपस्थित होते. दरम्यान, अमळनेर तालुक्याच्या विकासासाठी मंत्री अनिल पाटील यांनी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here