एमआयएमच्या माजी जिल्हाध्यक्षांनी ‘वंचित’च्या भावी आमदाराचे लावले फलक

0
23

वंचितच्या नेत्याने जाहीर पत्रक काढून केला निषेध

साईमत/मलकापूर/प्रतिनिधी :

वंचित बहुजन आघाडीने संपूर्ण महाराष्ट्रात आतापर्यंत एकही विधानसभेचा उमेदवार घोषित केलेला नाही. अशातच मलकापूर शहरात एका एमआयएमच्या माजी जिल्हाध्यक्ष नगरसेवक शहजाद खान याने वाढदिवसानिमित्त शहरात वंचित बहुजन आघाडीचे भावी आमदाराचे फलक लावल्याने वंचितच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. ‘वंचित’ने कुठलाही उमेदवार जाहीर न केल्याचे ‘वंचित’चे जिल्हा उपाध्यक्ष बाळा दामोदर यांनी पत्रक काढून निषेध व्यक्त केला आहे.

वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रात विधानसभेसाठी आतापर्यंत उमेदवार घोषित केलेले नाही तर जिल्हाध्यक्ष देवाभाऊ हिवराळे यांच्या आदेशाने जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब दामोदर यांनी एका पत्रकाद्वारे जाहीर केले की, जिल्ह्यातील घाटाखालील तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष जिल्हा महासचिव हे पद खालीच केले आहे तर ‘वंचित’चे काही माजी पदाधिकारी स्वतःला आम्हीच सर्वेसर्वा असल्याचे भूषवित मलकापूर एमआयएमच्या जिल्हाध्यक्ष पदावरून हकालपट्टी झालेल्या शहजात खान यांच्या गुडघ्याला बाशिंग बांधून मलकापूर मतदारसंघात नाचवत असण्याचे चित्र सध्या मलकापूर शहरामध्ये रंगत असल्याचेही पत्रकात नमूद केले आहे.

पदाधिकाऱ्यांमध्ये उमटतोय नाराजीचा सूर

मलकापूर तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे सुरुवातीपासून पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.तर येणाऱ्या विधानसभेचा निर्णय वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर घेतील आणि तो आम्हा सर्वांना मान्य असेल, असे दामोदर यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे जाहीर केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here