साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन तर्फे विद्यार्थ्यांच्या सुदृढ व तंदुरुस्त शरीरासाठी विविध योजना राबवत असताना त्याच उद्देशाने क्रीडा स्पर्धांचेही आयोजन केले जाते. हॉकी स्पर्धांमध्ये मिल्लत हायस्कूल, मेहरूण, जळगावच्या संघाने बाजी मारली मागील परंपरा कायम ठेवत यंदाही विजयी पदक पटकावले. अँग्लो उर्दू हायस्कूल सोबत चुरशीच्या स्पर्धेनंतर बाजी मारली.
मिल्लतच्या या संघात इयत्ता 10वी (ब) च्या विद्यार्थ्यांमध्ये उमर शेख नईमुद्दीन, जोहैब झाकीर हुसेन, मंजर सय्यद अलीम उत्कृष्ट कामगिरी केली त्याबद्दल त्यांना शाळेतर्फे पारितोषिक देण्यात आले. क्रीडा शिक्षक मुख्तार सय्यद यांनी खेळाडूंना उत्कृष्ट मार्गदर्शन केले. मिल्लत व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मोहम्मद रफिक शाह सर, इतर विश्वस्तांसह शिक्षिका अफिफा शाहीन मॅडम, पर्यवेक्षक ताजुद्दीन शेख यांनी शाळेच्या उत्कृष्ट यशाबद्दल अभिनंदन केले.