जळगाव शहर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील रेल्वेस्थानक येथील १८ वर्षीय तरूणी ही घरात कुणाला काहीही न सांगता बेपत्ता झाली आहे. याप्रकरणी गुरूवारी, २२ मे रोजी जळगाव शहर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद केली असल्याचे सांगण्यात आले. रजनी पुरूषोत्तम आदिवासी (वय १८, रा. बळेगाव, ता.रायपुरा, मध्यप्रदेश) असे बेपत्ता झालेल्या तरूणीचे नाव आहे.
आदिवासी तरूणी रजनी ही आपल्या कुटुंबियांसह २१ मे रोजी सकाळी १०.३० आपल्या नातेवाईकांसह जळगाव येथील रेल्वेस्टेशन येथे आली होती. त्यानंतर तरूणीने कुणाला काहीही न सांगता घरातून कुठेतरी निघून गेली. त्यानंतर तिच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. परंतू कोणतीही माहिती मिळू शकली नाही.
अखेर तिच्या पालकांनी नजिकच्या शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून बेपत्ता झाल्याची नोंद केली आहे. तपास पोलीस नाईक सुधीर साळवे करीत आहे.