साईमत लाईव्ह भुसावळ प्रतिनिधी
हा समारंभ 5 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता ब्राह्मण संघाच्या स्वातंत्रवीर सावरकर सभागृहात संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्षपद रेल्वे स्कूलचे प्राचार्य सतीश कुलकर्णी यांनी भूषविले .कार्यक्रमाची सुरवात मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्वलनाने झाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय जोशी अध्यक्ष ब्राह्मण संघ यांनी केले सतीश कुलकर्णी प्राचार्य रेल्वे स्कूल यांच्याहस्ते बोर्ड आणि विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये विशेष प्राविण्य मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी कोणाकडून प्रेरणा घेण्या पेक्षा आपल्यापासून कोणी प्रेरणा घेतली पाहिजे, असे यश, चारित्र्य संपादन केले पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
कार्यक्रमासाठी आमंत्रित म्हणून ब्राह्मण संघाचे माजी अध्यक्ष संजय जोशी,कार्यकारिणी सदस्य गुणवंत विद्यार्थी आणि त्यांचे कुटुंबिय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सांगता पसायदान करण्यात आली
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय बोचरे ,हेमंत भोकरडोळे व व्यवस्थापक वैभव कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज जोशी यांनी केले.