साईमत, बोदवड : प्रतिनिधी
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त सेवा फाउंडेशनकडून अभिवादन करण्यात आले. तसेच बोदवड येथील न.ह.रांका हायस्कूल विद्यालयाची विद्यार्थिनी गायत्री दिलीप चौधरी ही १०वीच्या परीक्षेत (९२.८० टक्के) प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. त्यानिमित्त गायत्री आणि तिच्या पालकांचा सेवा फाउंडेशनकडून नुकातच सत्कार केला.
गायत्रीला सेवा फाउंडेशनकडून शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देण्यात आले. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.विशाल चौधरी, डॉ.वैभव पाटील, डॉ.दिलीप तेली, धनगर सर, विवेक वखरे, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष अतुल अग्रवाल, दिलीप तेली यांच्यासह पालक उपस्थित होते.