मू.जे.महाविद्यालयात ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियानास प्रारंभ

0
4

साईमत, जळगाव : प्रतिनिधी

केंद्र सरकार पुरस्कृत तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण देशात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तसेच स्वतंत्रता सेनानींच्या सन्मानासाठी ‘मेरी मिट्टी मेरा देश’ कार्यक्रम राबविला जात आहे. के.सी. ई. च्या मुळजी जेठा महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना शाखेच्यावतीने ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियानास सुरुवात झाली. सर्व एनएसएसच्या कॅडेट्‌‍सनी आपापल्या गावातून आणलेली माती अमृत कलशामध्ये टाकली. कार्यक्रमाची सुरुवात करताना महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रो.स. ना. भारंबे यांनी सर्वात अगोदर अमृतकलशामध्ये माती टाकून स्वातंत्र्यवीरांना नमन केले.

यावेळेस त्यांनी या अभियानाची आवश्यकता आणि महत्व काय आहे? यावरही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला भाषा प्रशालेचे संचालक प्रो. भूपेंद्र केसुर, रासेयोचे कार्यक्रमाधिकारी डॉ. विशाल देशमुख, सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ. अखिलेश शर्मा, डॉ. जयश्री भिरूड, रेडिओ मनभावनचे अमोल देशमुख, डॉ.नासिकेत सूर्यवंशी यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच रा.से.यो.चे विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here