साईमत, जामनेर : प्रतिनिधी
येथील ज्ञानगंगा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमांतर्गत केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियान राबविण्यात आले.
विद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये ‘माझी माती, माझा देश’ या उपक्रमाची जाणीव व जागृतीकामी सर्व विद्यार्थ्यांना शासनाच्या सूचनेप्रमाणे सकाळी १० वाजता पंचप्राण शपथ देण्यात आली. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र सोनवणे यांनी ‘मेरी मिट्टी मेरा देश’ या उपक्रमाबद्दल माहिती विशद केली. यावेळी विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. यावेळेस विद्यार्थ्यांनी ‘वसुधा वंदन आणि स्वातंत्र्यसैनिक’ या विषयावर आधारित निबंध स्पर्धेत सहभाग घेतला. यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.