साईमत मलकापूर प्रतिनिधी
नगर परिषद मलकापूर द्वारा “मेरी माटी मेरा देश” या उपक्रमांतर्गत शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्याकडून एक मुठ माती अमृत कलश मध्ये जमा करण्यात आली.
नगर परिषद मलकापूरच्या “मेरी माटी मेरा देश” या उपक्रमांतर्गत शहरातील विविध शाळेमधून तसेच न. प. मराठी प्राथ. शाळा, जिल्हा परिषद हायस्कूल, गो. वि. महाजन विद्यालय, हिराबाई संचेती कन्या विद्यालय, झेड. ऐ उर्दू हायस्कूल आदी शाळेतील विद्यार्थ्यांनी आपआपल्या घरून तुळशी वृदांवनातील एक मुठ माती मृत कलशामध्ये टाकून हुतात्म्यांच्या सन्मानार्थ व देश भक्तिची भावना जोपासल्या. यावेळी नगर परिषद अधिकारी व कर्मचारी तसेच शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.