साईमत लाईव्ह पाचोरा प्रतिनिधी
तालुक्यात एका गावात मतिमंद तरूणी अत्याचारामुळे गर्भवती झाल्याचे लक्षात आल्यावर नातेवाईकांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविल्यावर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे .
तालुक्यात एका गावात तरूणाने २३ वर्षीय मतिमंद तरूणीवर अत्याचार केल्याने ती गर्भवती झाली. त्याने ही बाब कुणास न सांगण्याची धमकीही दिली होती .माञ पिडित मतिमंद तरूणीला डॉक्टरांकडे उपचारासाठी नेेल्यावर सर्व प्रकार उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली. पिडित तरूणीच्या नातेवाईकांनी त्या तरूणाविरूध्द पोलिसात गुन्हा नोंदविला असुन संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे पुन्हा तरूणींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पाचोरा पोलिसांनी फिर्यादिवरून या आरोपीविरोधात गुरन ४१९ भादवी ३७६ (२)(ख), ३७६(२)(छ), ४५१, ५०६, अनुसुचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ चे कलम ३(१)(थ)(ळ), ३(२)(पाच)प्रमाणे ज्योतीलाल पाडुरंग पाटील यांचविरूध्द गुन्हा नोंदविला आहे . फिर्यादी पिडित तरूणीच्या शेजारी राहणारा नातेवाईक आहे. पिडित तरूणीची ६० वर्षीय आईपण मतिमंद आहे.
संशयित आरोपी ज्योतीलाल पाटील (२५) हा नेहमी त्यांच्या घरी येत-जात होता. पाच महिन्यांपासुन या तरूणानेे राञी पिडितेची आई झोपली असल्याचा गैरफायदा घेत तिच्यावर अत्याचाराचा नित्यक्रम सुरू केला होता. महिनाभरापुर्वी पिडित तरुणीच्या शेजारी नातेवाईकांनी ज्योतीराम पाटीलला दुष्कृत्य करतांना रंगेहाथ पकडले होते.
पोळ्यादरम्यान पिडित तरूणी, तिची आई व शेजारची नातेवाईक महीलाही आजारी होती. त्या गिरड येथे सरकारी दवाखान्यात तपासणीसाठी गेल्यावर तेथे डॉक्टरांनी पिडित तरूणी व तिच्या आईचीही तपासणी केली. त्यावेळी डॉक्टरांनी सांगितले की, ती तरूणी गर्भवती आहे . त्यानंतर घरी आल्यावर. ज्योतीरामबद्दल पिडित तरूणीस विचारले असता तिने हातानी ४ ते ५ वेळेस आला होता असे सांगितले तिने सांगितलेल्या घटनेवरुन पिडिताच्या आईसह नातेवाईकांनी पाचोरा पोलिसात ज्योतीलाल पाटीलविरूध्द फिर्याद दिली आहे.