चाळीसगाव महाविद्यालयात ‘करिअर निवड: यशाच्या मार्गावर नेव्हिगेट करणे’वर व्याख्यान
साईमत।चाळीसगाव।प्रतिनिधी।
विद्यार्थ्यांनी करियर करत असताना येणारे नैराश्य टाळण्यासाठी त्यापूर्वी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांकडून SWOT चाचणी करून मानसिक स्थिरता येण्यासाठी निर्णय क्षमता वाढविण्यासाठीच्या महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा करावी. तसेच विद्यार्थ्यांना उत्तम करियरसाठी मानसिक स्थैर्य गरजेचे असल्याचे प्रतिपादन प्रा. गिरीष भास्कर महाजन यांनी केले. येथील बी.पी. आर्ट्स, एस. एम. ए. सायन्स आणि के. के. सी. कॉमर्स महाविद्यालयात भूगोल विभागाद्वारे “करिअर निवड: यशाच्या मार्गावर नेव्हिगेट करणे” विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. त्यावेळी ते मार्गदर्शन करतांना बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डी. एल. वसईकर होते.
उपप्राचार्य वसईकर यांनी मनोगतात भूगोल विषयाच्या विद्यार्थ्यांनी स्थानिक भौगोलिक माहितीचे संकलन करावे, असे सांगून भूगोल विषयात असणाऱ्या विविध करियरच्या संधीवर माहिती देऊन मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला प्रा. निलेश पाटील, प्रा. हितेश भोसले यांच्यासह बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
यशस्वीतेसाठी धनसिंग पाटील यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक भूगोल विभाग प्रमुख डॉ. विजय बाविस्कर तर सूत्रसंचालन ट्रेनिंग ॲण्ड प्लेसमेंटचे समन्वयक प्रा. किशोर पाटील यांनी केले.